मस्कतच्या विमानातून 22 लाखांचे दागिने जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - मस्कतहून आलेल्या विमानातील स्वच्छतागृहातून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) 22 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मुंबई विमानतळावर नुकतीच ही कारवाई करण्यात आली. केबिन क्रूच्या दक्षतेमुळे ही तस्करी उघड झाली. फेब्रुवारीत "एआययू'ने 30 किलो सोने जप्त केले आहे. विमानातील स्वच्छतागृहातील कमोडमधून पाणी येत असल्याने विमानातील कर्मचारी तेथे गेला होता. तेव्हा त्याला तेथे वस्तू ठेवल्याचे दिसले. याबाबत त्याने "एआययू'ला माहिती दिली. उपायुक्त प्रज्ञाशील जुमले यांचे पथक मुंबई विमानतळावर तैनात होते. त्यांनी तपासणी केली असता त्यात सोन्याचे दागिने सापडले.
Web Title: jewellery seized in maskat aeroplane