हत्येचा गुन्हा दाखल करण्यास सूरजचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई - अभिनेत्री जिया खान हत्या खटल्यातील आरोपी सूरज पांचोली याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, या जियाच्या आईच्या मागणीला सूरजने सत्र न्यायालयात गुरुवारी विरोध केला.

मुंबई - अभिनेत्री जिया खान हत्या खटल्यातील आरोपी सूरज पांचोली याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, या जियाच्या आईच्या मागणीला सूरजने सत्र न्यायालयात गुरुवारी विरोध केला.

जियाने चार वर्षांपूर्वी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सूरजशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे; मात्र जियाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाली आहे, असा आरोप तिची आई राबिया यांनी न्यायालयात केला आहे. सूरजविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिने अर्जाद्वारे केली आहे. सूरजच्या वतीने आज या मागणीचे खंडन करण्यात आले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जियाच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर यापूर्वी निर्णय दिला आहे. त्यामुळे हा अर्ज अमान्य करावा, अशी मागणी सूरजच्या वतीने करण्यात आली आहे. खटल्याची सुनावणी 4 मे रोजी होणार आहे.