जिजामाता उद्यानातील प्रवेश शुल्कवाढ वादात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुंबई - भायखळा येथील जिजामाता उद्यानातील प्रवेश शुल्क पाच रुपयांवरून शंभर रुपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. याला भाजपसह सर्व विरोधी पक्षांकडून विरोध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक वादळी ठरेल. 

उद्यानात पेंग्विन आणल्यामुळे प्रशासनाने प्रवेश शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत सर्व पक्षांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी या शुल्कवाढीला विरोध करणार असल्याचे जाहीर केले. याविषयीचे पत्र पालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रवेशशुल्क वाढीला नागरी संघटनांनीही विरोध केला आहे.