कल्याण - जीवनदीप गोवेली कॉलेजची  बारावी परीक्षेत यशस्वी वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल 95 टक्के लागला असून या महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा सर्वाधिक 98.10 टक्के निकाल लागला. तर वाणिज्य शाखेचा निकाल 95.10 टक्के आणि कला शाखेचा निकाल 89.20 टक्के लागला आहे. 

विज्ञान शाखेती संचिता भालचंद्र कोळंबे या विद्यार्थिनींने 90.76 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर करुणा नायडू हिने वाणिज्य शाखेत 89 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कल्याण ग्रामीण भागातील सर्वाधिक निकाल जीवनदीप महाविद्यालयाचा आहे. या महाविद्यालयात 630 पैकी 602 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत,

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे शिक्षणासोबतच घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी घरगुती व्यवसाय,शेती किंवा नोकरी करून शिक्षण घ्यावे लागते.अश्या बिकट परिस्थिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळविले आहेत. जीवनदीप महाविद्यालयातील शिक्षकवर्ग नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवित असतो.बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत अतिरिक्त तासिका घेतल्या जातात.तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर महाविद्यालयाचा भर असतो.

महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ.के.बी. कोरे व प्रकाश रोहणे यांनी गुणवत्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: jivandip college successful in 12th examination