पिसाळलेला कुत्रा चावल्याने कळंबोलीत 17 नागरिक जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कळंबोली - कळंबोली वसाहतीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने 17 नागरिकांचा चावा घेतला. या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रात्री उशिरा कामावरून येताना ही भटकी कुत्री अंगावर धावून येत असल्याने चाकरमानी जीव मुठीत घेऊन जात असतात.

कळंबोली वसाहतीत बुधवारी (ता. 9) पिसाळलेल्या कुत्र्याने दुपारपर्यंत 17 जणांना चावा घेतला. हा कुत्रा पकडण्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत यश आले नाही. जखमी नागरिकांना सिडकोच्या आरोग्य केंद्रात रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली. यापूर्वी तळोजा परिसरातील खुटारी गावात पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी एका सात वर्षांच्या मुलीचा बळी घेतला होता.