कुरुंदकर, पाटील यांचा नार्को टेस्टला विरोध

कुरुंदकर, पाटील यांचा नार्को टेस्टला विरोध

कळंबोली - सहायक महिला पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांनी नार्को टेस्ट आणि ब्रेनमॅपिंग करण्यास नकार दिला आहे. याबाबत उद्या (ता.27) पनवेल न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे.

अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या पाठोपाठ राजेश पाटील याला अटक केली होती. त्यांची मंगळवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना पनवेल न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दोन जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय सुनावला होता. या सुनावणी दरम्यान, संशयित आरोपी हे पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याचा मुद्दा नवी मुंबई पोलिस आणि सरकारी वकिलांकडून न्यायालयासमोर उपस्थित करीत या दोघांची ब्रेनमॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या मागणीला कुरुंदकर आणि पाटील यांनी विरोध दर्शविला आहे. यासाठी न्यायालयात आपल्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी या दोघांनी नामांकित कायदेतज्ज्ञांची मदत घेण्यास सुरवात केली असल्याचे समजते.

अश्विनी बिंद्रे या 11 एप्रिल 2016 पासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात पोलिसांना मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे कुरुंदकर यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या वेळी कुरुंदकर यांच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड व ज्या दिवशी अश्विनी या बेपत्ता झाल्या व त्यांचे शेवटचे असलेले लोकेशन नंतर त्याच वेळी कुरुंदकर याने राजेश पाटील याला संपर्क केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पाटील याला ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com