जमावाच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

कळवा - पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पौंड पाडा परिसरात एका घरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा सोमवारी (ता.20) मध्यरात्री जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला.

कळवा - पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पौंड पाडा परिसरात एका घरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा सोमवारी (ता.20) मध्यरात्री जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला.

शत्रुघ्न परम यादव (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे. कळवा पूर्वेकडील पौंड पाडा परिसरात राहणाऱ्या जगतप्रसाद यादव यांच्या घरात शत्रुघ्न यादव चोरीच्या उद्देशाने घुसला. त्याच्या आवाजाने घरात झोपलेल्या माणसांना जाग आली. तेव्हा शत्रुघ्न याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जमावाने त्याला मारहाण केली. या मारहाणीत शत्रुघ्न याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र जगप्रसाद यादव (25), जगतप्रसाद सुरत यादव (52), पंचलाल कुमार यादव (26), दयालाल यादव (39) या चौघांना आज अटक केली.

Web Title: kalava mumbai news thieft death in beating

टॅग्स