गटार गंगेत फुलला दूषित भाजीचा मळा

vegitables
vegitables

कळवा- सध्या ठाणे, मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर हिरवागार स्वस्त भाजीपाला मिळत आसल्याने गृहिणींना त्याची भुरळ पडू लागली आहे. या स्वस्त भाज्या घेण्यासाठी सध्या मुंबई व ठाण्यातील बाजारात महिलांची गर्दी होताना दिसत आहे. परंतु, या फेरीविक्रेत्या भाजीविक्रेत्या कडून घेतलेला भाजीपाला बेचव व शरीराला घातक परिणाम करणारा असून, तो कळवा पूर्वेतील सध्या मफतलाल कंपनीच्या कोर्ट रिसिवरच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागेवर गटारांतील दूषित पाण्यावर जोपासला जात आहे. हा भाजीपाला विक्रीसाठी ठाणे ते दादर परिसरातील भाजी मंडईमध्ये पाठविला जात आहे. या भाज्यामुळे ठाणे मुंबईतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कामगार आणि कंपनीच्या वादात कळवा पूर्वची मफतलाल कंपनी बंद पडली. हा प्रश्न न्यायलयात असल्याने ही जागा सध्या जागा न्यायालयाच्या ताब्यात आहे. असे असताना या जागेवर काही स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तेथे मोठया प्रमाणावर भाजीपाला लागवड सुरू केली आहे. भाजीपाला लागवड करणाऱ्याकडून खारीगाव येथील शेतकरी व काही राजकिय पक्षांचे पुढारी भाडे वसूल करतात. कळवा पूर्वेतील भास्कर नगर, पौंड पाडा, घोलाई नगर परिसर पारसिक डोंगराच्या पायथ्याशी आहे. तेथील मोठ्या मोठ्या गटारात डोंगराळ भागातील झोपड्यांतील सांडपाणी, घाण, कचरा, प्लस्टिक या गटारात वाहत येते अनेक छोटी गटारे ही या मोठ्या गटारात सोडण्यात आली आहेत. या गटारात कचरा कुजतो याच गटारातील पाण्यावर वाफे करून इंजिन व मोटारी लावून सर्वत्र रबरी व प्लास्टिक पाईपलाईनने गटाराचे पाणी या नवीन भाजीपाला मळ्या साठी वापरला जाते. 

चवळी, पालक, माठ, मुळा, दुधी, राई, मेथी इत्यादी भाजीपाला लागवड येथे केली आहे. विशेष म्हणजे भाज्या उपटल्या नंतर त्या भाज्या तेथील वाहत्या गटारात धुतल्या जातात. रोज येथील शेकडो क्विंटल भाजीपाला ठाणे ते दादर पर्यंत मंडईत रोज विक्रीसाठी पाठवला जातो. त्यामुळे सकाळी नाशिक, पुणे येथून येणाऱ्या भाजीपाला पेक्षा कळव्यातील या भाज्या स्वस्त आसल्याने अनेकजण त्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसतात. या भाज्या गटाराच्या दूषित पाण्याचा वापर करून पिकवलेल्या आसल्याने त्या शिजवल्यावर बेचव होतात त्याला विशिष्ट प्रकारची दुर्घनधी येते. गटाराच्या पाण्यात नापीक झालेल्या जमिनीत ही पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचाही वापर केला जात असल्याने या भाज्या खाल्ल्यावर अंगाला खाज, पुरळ येणे, अल्सर, मुतखडा, यांसारखे आजार बळावतात. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अशी माहिती डॉ. देवानंद पाटील या खासगी डॉक्टरांनी दिली. या प्रदूषित भाज्यांच्या विक्रीकर महापालिकाने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी कळवा खारीगाव येथील नागरिकांनी केली आहे.

'कळव्यात पिकविलेल्या या भाज्यांना विविध प्रकारची दुर्गंधी येते तसेच त्या बेचव होतात 'अशी माहिती मुलुंड येथील प्रांजली पवार व विटावा येथील सुनीता गुंड या गृहिणीनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

तर भाजी पिकवणाऱ्या एका उत्तर भाषिक शेतऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की "हम ये खेती किरायेसे लेते है हम हर महिना किराया मलिक ने भेजे हुये आदमी के पास देते हैं हमे मलिक का नाम ही मालूम नही! हा भाजीपाला ठाणे व मुंबईत विक्रीसाठी घेऊन जातो "
रामनारायण मिश्रा, भाजीपाला विक्रेता शेतकरी, कळवा पुर्व

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com