रेल्वे स्थानकात कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रवासी संघटनांची मागणी

रविंद्र खरात
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कल्याण : भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले आणि कचरा हा प्रश्न सर्वच रेल्वे स्थानकामध्ये बिकट होत चालला असून, रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर कचरा करू नका, थुंकू नका, भिकारीला पैसे देऊ नका, असे जनजागृतीचे पोस्टर सर्वांचे लक्ष्य वेधत आहे. जनजागृती करून ही जे प्रवासी ऐकत नाही, कचरा टाकतात यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनाने केली आहे.

कल्याण : भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले आणि कचरा हा प्रश्न सर्वच रेल्वे स्थानकामध्ये बिकट होत चालला असून, रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर कचरा करू नका, थुंकू नका, भिकारीला पैसे देऊ नका, असे जनजागृतीचे पोस्टर सर्वांचे लक्ष्य वेधत आहे. जनजागृती करून ही जे प्रवासी ऐकत नाही, कचरा टाकतात यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनाने केली आहे.

कल्याण सहित सर्वच रेल्वे स्थानकाच्या परिसरमध्ये भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले, कचरा, घाणीचे साम्राज्य आदी प्रश्न बिकट होत आहेत, रेल्वेच्या पादचारीपुलावर उभे राहून तोंडातील तंबाखू, गुटखा, पानाची पिचकारी मारणे, चॉकलेट, चिंगम खाऊन त्याचा कचरा फेकणे. त्यात बेकायदेशीर बसलेल्या फेरीवाले रात्री गपचूप कचरा पुलाच्या कोन्यावर टाकून निघून जातो. यामुळे अनेक वेळा रेल्वे सेवेवर पावसाळ्यात परिणाम झालेला समोर आला आहे. पादचारी पुलावरील कचरा हवेने स्थानकातील शेडवर आणि तो जातो रेल्वे लाईनच्या बाजूच्या छोट्या गटार मध्ये जातो. कचरा निघून गेल्याने गटार तुंबून ते पाणी रेल्वे लाईनवर येते आणि सेवा विस्कळीत होते तर अनेकवेळा हाच कचरा चक्क ओव्हरहेड वायरवर अडकल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनने कचरा करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई केली आहे. यावेळी अनेक प्रवासी संघटनांनी जनजागृती करा पोस्टर लावा, अशा मागण्या केल्या होत्या.

लक्ष्य वेधणारे पोस्टर...
कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी स्टेशन परिसर मधील पुलावर अनेक प्रबोधन करणारे पोस्टर लावले असून, ते सध्या लक्ष्य वेधणारे आहेत. शोले आणि दिवार चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा चांगला उपयोग केला आहे. शोले चित्रपटात अमजद खान सांभाला त्यावर सरकारने पकडण्यासाठी किती रक्कम लावली असा प्रश्न केला होता. याच धर्तीवर रेल्वे स्थानकमध्ये कचरा केल्यास किती दंड आहे, असा प्रश्न करणारा पोस्टर लावला आहे. दुसरीकडे दिवार चित्रपट मधील फेमस डायलॉगचा विषय घेत मेरे मूह मे पान है पर मत थुकना ....तर फेरीवाला, भिकारी प्रश्न ही मांडला आहे. मात्र, हे पोस्टर लावून काही तास उलटत नाही तर पोस्टर लावलेल्या बाजूच्या पत्र्याच्या शेडवर पानाच्या पिचकाऱ्या मारल्या असून, कचरा कुंडीमध्ये कचरा न टाकता तो रस्त्यावरच टाकल्याचे समोर आले. यामुळे प्रवासी वर्गाची मानसिकता बदलणार कधी? असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे. दरम्यान, जनजागृती करून ही प्रवासी वर्गाची मानसिकता बदलत नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच्या मागणीला जोर धरू लागला आहे.

प्रतिक्रिया
कल्याण शहर आपले आहे तसे कल्याण रेल्वे स्थानक ही आपलेच आहे. आपण घरात कचरा घाण ठेवतो किंवा करतो का ? लगेच स्वच्छता करतो ना मग स्थानक मध्ये का? स्वच्छ रेल स्वच्छ भारत या योजने अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात हे पोस्टर आहेत आता जबाबदारी प्रवासी वर्गाची आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी केले आहे.

प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार प्रशासनने अनेक ठिकाणी कचरा कुंडी ठेवल्या आहेत, त्या आणखी वाढविल्या पाहिजे. जनजागृतीचे पोस्टर कौतुकास पात्र असून, जे प्रवासी अस्वच्छता करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केली आहे.

Web Title: kalya news Action on the garbage at the railway station