कल्याण-डोंबिवलीला एकही पैसा उपलब्ध नाही 

kdmc
kdmc

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेले 6 हजार 500 कोटींचे पॅकेज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एक वर्ष उलटूनही या पॅकेजमधील नवा पैसाही उपलब्ध झाला नसल्याची बाब समोर आल्याने ऐन महापालिका व जिल्हा परिषदांच्या तोंडावर भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून कल्याण-डोंबिवली महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती मागवली होती. मुख्यमंत्र्यांनी ऑक्‍टोबर 2015 मध्ये जाहीर केलेल्या 6500 कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी किती रक्कम मनपाला देण्यात आली, अशी विचारणा गलगली यांनी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने गलगलींचा अर्ज नगरविकास खात्याकडे आणि नगरविकास खात्याने एमएमआरडीएकडे वर्ग केला. केडीएमसी अकाउंट ऑफिसर आणि जनसंपर्क अधिकारी विनायक कुलकर्णी यांनी गलगलींना त्याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही, असे त्यांनी कळविले. फडणवीस यांनी 3 ऑक्‍टोबर 2015 रोजी कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीदरम्यान, 6500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. भाजपच्या विकास परिषदेत ही घोषणा केली होती. 

त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजचा नवीन मुद्दा शिवसेनेच्या हातात सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com