अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
Accused Arrested
Accused ArrestedSakal

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराला कंटाळून पिडीत मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 8 जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून या आरोपींची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, पोक्सो यासह सामुहिक बलात्काराचे कलम या केस मध्ये लावण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी दिली आहे.

कल्याण पूर्वेतील एका 17 वर्षीय मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार करुन तिच्यावर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 7 तरुणांसह एका मुलीचाही समावेश असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात 8 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींची पाच दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून याचा अधिक तपास केला जात आहे. या आरोपींविरोधात पुरावा मिळाला असल्याने कलम 305, 376 ड हा वाढीव कलम लावण्यात आला आहे. पोक्सो चे कलम 6 व 17, आयटी अॅक्ट चे कलम 66 ई व 67 बी हे कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले. याप्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com