डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवाले मुक्त करण्याचे आदेश

रविंद्र खरात
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कल्याणः 'कल्याण एसटी डेपो बनले मच्छी मार्केट' ही बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिध्द होताच या बातमीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गंभीर दखल घेत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याणः 'कल्याण एसटी डेपो बनले मच्छी मार्केट' ही बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिध्द होताच या बातमीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गंभीर दखल घेत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

'कल्याण एसटी डेपो बनले मच्छी मार्केट' ही बातमी दैनिक सकाळ मध्ये आज (सोमवार) प्रसिद्ध झाली होती. संबंधित बातमी सोशल मिडियावरून चांगलीच गाजली. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांच्या फेरीवाले विरोधी पथकाने आज सकाळीच धडक कारवाई केली. यावेळी फेरीवाले आणि मच्छीवाल्यांची चांगलीच धावपळ सुरु होती.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर मधील फुटपाथ आणि स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.  फेरीवाले हटवा असे आदेश देवून ही कारवाई दिसत नसल्याने पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी वर्गाला तंबी दिल्याचे समजते. स्थानिक पोलिस, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाला सोबत घेवून फेरीवाल्याविरोधात कारवाई करा, त्यात सातत्य ठेवा, अहवाल दया, याबाबत बुधवारी (ता. 13) आढावा बैठक घेणार असल्याचे पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले. आता पालिका अधिकारी आणि कर्मचारी फेरीवाल्याविरोधात काय कारवाई करतात याकडे लक्ष्य लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास

Web Title: kalyan news Dombivli railway station premises