कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई

रविंद्र खरात
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सेल्फी का जमाना है .....
कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेलरासु आठवड्यातील काही दिवस मुंबईमधील निवासस्थानी जात असतात. येताना पालिकेचे वाहन न वापरता ते लोकल रेल्वेने प्रवास करतात. येताना कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक बाहेरील स्कायवॉक़ पाहणी करत पालिका मुख्यालयमध्ये जातात. फेरीवाल्यांबाबत अधिकारी वर्गाला आदेश देवून ही अधिकारी नेहमी बैठकीमध्ये सांगत असतात की कारवाई सुरु आहे. यासाठी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी मागील आठवड्यात कल्याणमधील स्कायवॉकवर फेरफटका मारत चक्क त्यांनी सेल्फी फोटो काढले. त्यात त्यांच्या पाठिमागे फेरीवाले होते, अधिकारी बैठकीमध्ये ते फोटो दाखवित अधिकारी वर्गाची चांगलीच हजेरी घेतल्याने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु झाल्याचे समजते.

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर आणि स्कायवाक़ फेरीवाला मुक्त करा, असे आदेश कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने मंगळवारपासून फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु केल्याने फेरीवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरामधील फुटपाथ आणि स्कायवॉक़वर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने सर्व सामान्य नागरिकांना चालण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यावर पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी पालिका अधिकारी वर्गाला फेरीवाल्यावरील कारवाई बाबत तंबी दिल्यावर मंगळवारपासून पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांनी पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, दीपक हॉटेल, स्कायवॉक़, तहसीलदार कार्यालय परिसरामधील फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात धड़क कारवाई करण्यात आली. यावेळी शेकडो हातगाड्या तोड़ण्यात आल्या.

सेल्फी का जमाना है .....
कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेलरासु आठवड्यातील काही दिवस मुंबईमधील निवासस्थानी जात असतात. येताना पालिकेचे वाहन न वापरता ते लोकल रेल्वेने प्रवास करतात. येताना कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक बाहेरील स्कायवॉक़ पाहणी करत पालिका मुख्यालयमध्ये जातात. फेरीवाल्यांबाबत अधिकारी वर्गाला आदेश देवून ही अधिकारी नेहमी बैठकीमध्ये सांगत असतात की कारवाई सुरु आहे. यासाठी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी मागील आठवड्यात कल्याणमधील स्कायवॉकवर फेरफटका मारत चक्क त्यांनी सेल्फी फोटो काढले. त्यात त्यांच्या पाठिमागे फेरीवाले होते, अधिकारी बैठकीमध्ये ते फोटो दाखवित अधिकारी वर्गाची चांगलीच हजेरी घेतल्याने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु झाल्याचे समजते.

कल्याण स्टेशनपरिसर आणि स्कायवॉक फेरीवाला मुक्त करण्याच्या आदेशनुसार मंगळवारपासून फेरीवाल्यांविरोधात धड़क कारवाई सुरु झाली असून पुढील आदेश येईपर्यंत दोन सत्रात विशेष पथकामार्फ़त सुरु राहील अशी माहिती पालिका क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांनी दिली.