गणेशोत्सव काळात आरोग्याची काळजी घ्या: सुरेश देशमुख

रविंद्र खरात
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोठ्या गणेशोत्सव मंडळ प्रति दिन प्रसाद आणि सत्यनारायण पुजेच्या दिवशी महाप्रसाद ठेवतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ बनविला जातो ते अन्न स्वच्छ आरोग्यदायी जागेत बनवा, असे आवाहन अन्न व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

कल्याण : गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवतात. यावेळी नागरिकांच्या आरोग्याला घातक होणार नाही असे अन्न पदार्थ बनवा, नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन  व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळाना केले आहे.

कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोठ्या गणेशोत्सव मंडळ प्रति दिन प्रसाद आणि सत्यनारायण पुजेच्या दिवशी महाप्रसाद ठेवतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ बनविला जातो ते अन्न स्वच्छ आरोग्यदायी जागेत बनवा, असे आवाहन अन्न व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

गणेशोत्सव काळात अन्न व सुरक्षा विभागाचे प्रत्येक शहरात अनेक गणेशोत्सव मंडळाना भेटी देणार असून नियमाचे पालन न करण्याऱ्यावर कठोर करणार आहेत. दरम्यान प्रसादसाठी लागणारा कच्चा माल अन्नपदार्थ परवानाधारकाकडून खरेदी करा, प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करून ठेवावी, आवश्यक तेवढेच अन्न बनवा, अन्न बनविणाऱ्या आणि वितरण करणारी व्यक्तीस काही आजाराची लागण नाही ना हे पहा, अनेक दिवस साठवून ठेवलेले गोड पदार्थ, अन्न नागरिकांना देवू नका आदी सूचना अन्न व औषध विभागाच्या अधिकारी वर्गाने शहरातील मोठ्या आणि प्रमुख गणेश मंडळाना दिल्या असल्याची माहिती अन्न व औषध कोकण सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी सकाळला दिली.

नागरिकांना सूचना, तक्रार, माहिती साठी हेल्पलाईन क्रमांक 1800222365 कळवा. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या, नियम तोडणाऱ्या केटरर्स वेळप्रसंगी गणेशोत्सव मंडळानवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती यावेळी देशमुख यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :