कल्याण-डोंबिवलीमधील गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज

रविंद्र खरात
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पोलिसांचे कान आणि डोळे बनाः पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांचे आवाहन

कल्याण: गणेशोत्सवाच्या कल्याण डोंबिवलीकराना शुभेच्छा, उत्सव साजरा करताना जे नियम आहे त्याचे पालन करा, धन्वी प्रदूषण टाळा, रस्त्यात मंडप टाकू नका, प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी पोलिस आहेच मात्र त्यांचे कान आणि डोळा बना. संशयित वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यास कळवा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी केले आहे.

गणेशोत्सवास आज (शुक्रवार) पासून सुरुवात झाली आहे. हा उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलिस यंत्रणा ही सज्ज आहेत. कल्याण डोंबिवली शहरात एकूण 8 पोलिस ठाणे आहेत. या हद्दीत सार्वजनिक 291, 44 हजार 100 खासगी गणेशाची स्थापना होणार असून, गौरीची 2725 मूर्तीची स्थापना होणार आहे. विसर्जन सोहळासाठी चोख पोलिस बंदोबस्त असून, प्रत्येक मिरवणुकीवर पोलिसांची नजर असणार आहे. दीड दिवसाचे 13 हजार 170 गणेश मुर्तींचे विसर्जन होईल. मंगळवार ता 29 ऑगस्ट 2017  पाचव्या दिवशी सार्वजनिक 24 आणि खासगी 7 हजार 335 गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. बुधवारी (30 ऑगस्ट) 2017 सहाव्या दिवशी सार्वजनिक 7 आणि खासगी 1 हजार 270 गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. गुरुवारी (ता. 31 ऑगस्ट) 2017 सातव्या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन आहे त्या दिवशी सार्वजनिक 53 आणि 10 हजार खासगी गणेशमुर्तीचे विसर्जन होईल.

शनिवारी (2 सप्टेबर) नवव्या दिवशी मेळा संघ आणि एकादशी आहे. सार्वजनिक 34 आणि खासगी 1 हजार 775 गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे. रविवारी (ता. 3) दहाव्या दिवशी सार्वजनिक गणेशमुर्तीचे विसर्जन होईल. मंगळवारी (ता. 5 सप्टेबर) 12 वा दिवस अंनत चतुर्थी दिवशी 172 सार्वजनिक आणि खासगी 10 हजार 550 गणेशमुर्तीचे विसर्जन होईल.

गणेशोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी आठ पोलिसांची फौज असताना आणखी 250 पोलिस अधिकारी कर्मचारी बाहेरुन आले आहेत. त्यांच्या समवेत एसआरपीच्या 2 तुकडया आहेत. कडेकोट बंदोबस्त आहेच, मात्र गणेशभक्तांनी नियमाचे पालन करण्याचे आवहान पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. पोलिसांचे डोळे आणि कान बनत पोलिसांना मदत करण्याचे आवाहान यावेळी उपायुक्त डॉ शिंदे यांनी केले आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट