शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी वेळ कमी पडेल: गुलाबराव पाटील

रविंद्र खरात
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

इतिहास सांगणे सहज शक्य आहे मात्र खरा इतिहास सांगणे फार कठीण असल्याचे व्याख्याते गुलाबराव पाटील यांनी सांगत अफजलखानच्या वध करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धनिती कशी वापरली याचे संदर्भ सांगताना म्हणाले की अनेक पारंगत असलेल्या कला अवगत असणारे 247 मावळे कमी वेळेत शिवरायांनी जमा केले. त्या काळात जीवाला जीव देणारी माणसे होती त्यामुळे शिवरायांनी स्वराज्य उभे केले मात्र आज ती माणसे शोधून ही सापडत नसल्याचे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

कल्याण : एखादी महिला पेटून उठली तर एक समाज घडवु शकते, इतिहास निर्माण करू शकते, त्याचे उदाहरण म्हणजे जिजाऊ माँसाहेब, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मिळाले, जिजाऊ नसत्या तर त्या काळात महिला सुरक्षित नसत्या त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. तो सांगण्यासाठी वेळ ही कमी पडेल, असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी कल्याण पूर्व मधील एका कार्यक्रमात केले.

भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आयोजित दोन दिवसीय शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शन शनिवारी सकाळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी साडे सातच्या सुमारास व्याखानाचे आयोजन करण्यात आले. डोंबिवली मधील गुलाबराव पाटील यांनी शिवरायांची युद्धनिती या विषयावर व्याख्यान दिले. शिवरायांचा इतिहास सांगता सांगता ताज्या घडामोडीचा दाखले देत उपस्थितांचे मन जिंकून घेतले. शिवरायांनी कमी वयात अनेक लढाई संयमाने आणि धाडसीने आणि नियोजनाने जिंकल्या. मात्र आजचा तरुण सामाजिक कार्यापासून लांब जात असल्याची नाराजी यावेळी पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. 

जेव्हा शिवाजी महाराज चौदा, पंधरा वर्षाचे होते तेव्हा स्वराज्याची शपथ घेवून अनेक लढाई लढले मात्र आजचा तरुण या वयात काय करतो? असा सवाल करत पुढे म्हणाले की या तरूणांना मी दोष देणार नाही, कारण हेच तरुण इंग्रजाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहेत. आजकालच्या तरुणामध्ये शिवाजी महाराजांप्रमाणे जोश, उत्साह, खूप कला आहे. मात्र संयम आणि नियोजन नसल्याने भरकटत जात असल्याची खंत यावेळी पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

इतिहास सांगणे सहज शक्य आहे मात्र खरा इतिहास सांगणे फार कठीण असल्याचे व्याख्याते गुलाबराव पाटील यांनी सांगत अफजलखानच्या वध करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धनिती कशी वापरली याचे संदर्भ सांगताना म्हणाले की अनेक पारंगत असलेल्या कला अवगत असणारे 247 मावळे कमी वेळेत शिवरायांनी जमा केले. त्या काळात जीवाला जीव देणारी माणसे होती त्यामुळे शिवरायांनी स्वराज्य उभे केले मात्र आज ती माणसे शोधून ही सापडत नसल्याचे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवाजी महाराजाचा जन्म ते अफजलखान वध हा कालावधी मधील घटनाक्रम सांगत असताना गुलाबराब पाटील यांनी अनेक इतिहासकारावर टिका करत म्हणाले, की शिवाजी महाराज जन्म तारीख ते भवानी तलवार संबधी माहिती चुकीच्या पद्धतीने मांडत जात असल्याची खंत व्यक्त करत म्हणाले की आज ही राज्यातील आदिवासी पाड्यावर राहणारी जनता मूलभूत सुविधा पासून वंचीत असून तेथे वर्षातून एकदा तरी मदतीचा हात देण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

शिवाजी महाराजाचा काळ आजचा काळ खूप फरक आहे, आजचे तरुण भाग्यवान आहेत बटन दाबले की सर्व काही समोर मिळते मात्र शिवाजी महाराजांना खूप संघर्ष आणि धाडस करावे लागले. आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजाचा अभ्यास करताना आपल्या आयुष्यात संयम आणि नियोजन आखले तर एक मोठा इतिहास घडवतील असल्याचा दावा व्याख्याते गुलाबराव पाटील यांनी केला. यावेळी व्यासपीठावर आयोजक संजय मोरे, संदीप तांबे, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.