कल्याण पालिकेला उशिरा सुचले शहाणपण...

रविंद्र खरात
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पालिका मुख्यालय मधील साचलेला कचरा आणि भंगार काढण्यास सुरुवात

कल्याणः पालिका हद्दीत स्वच्छतेचा नारा देणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयामध्ये भंगार आणि कचरा साचल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचे आरोग्य सुरक्षित आहे का? 'लोकांस सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण', अशी आशयाची बातमी 'सकाळ'मध्ये 26 सप्टेंबर रोजी बातमी प्रकाशित झाली होती. पालिकेच्या वर्धापन दिन आणि महात्मा गांधी दिनाचे औचित्य साधून पालिका मुख्यालय मधील कचरा आणि भंगार उचलण्यास सुरुवात झाली असून, उशीरा सुचलेले शहाणपणची चर्चा पालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय मधील लेखा विभाग मधील महिला अधिकारी श्वेता सिंहासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र समोर असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

पावसाळा किंवा त्यापूर्वी साथीचे आजार पसरू नये, म्हणून पालिका आवाहन करत असते. घरा जवळ कचरा साचू देऊ नये, पाण्याचा निचरा होऊ द्या, भंगार साचू देऊ नका, पाणी स्वच्छता ठेवा असे अनेक आवाहन केले जातात. मात्र, पालिका मुख्यालयमध्ये कचरा आणि भंगाराचे साम्राज्य अशी बातमी 'सकाळ'मध्ये 26 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. यामुळे पालिकेचा पोलखोल करत पालिका स्वच्छते बाबत गंभीर नसल्याचे समोर आणले. बातमी प्रकाशित होताच सोशल मीडियावर पालिकेच्या कारभारावर चांगलीच टीका झाली.

दरम्यान, रविवारी आणि आज (सोमवार) महात्मा गांधी जयंती निमित्त शहरात स्वच्छता मोहीम समवेत पालिका मुख्यालयमधील विविध विभाग कार्यालयमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले. पालिका मुख्यालय परिसर मधील कचरा जाळण्यास तर भंगार उचलण्यास सुरुवात झाली. यामुळे पालिका मुख्यालय परिसर मोकळा होऊ लागल्याने पालिकेला उशिरा सुचलेल्या शहाणपणाची चर्चा चांगलीच रंगली होती.

Web Title: kalyan news kalyan municipal and garbage issue