'आमचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का?'

रविंद्र खरात
गुरुवार, 29 जून 2017

आम्ही ही पालिकेचा कर भरतो आम्हाला ही सुविधा हव्यात.... पाच दिवस कचरा न उचल्याने मूसळधार पावसात तो कचरा घरात आणि दारात आल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले असून, आमचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल कल्याण पूर्व मधील सूचक नाका मधील महात्मा फुले नगर मधील नागरिकांची व्यथा...

कल्याण: कल्याण पूर्व सूचकानाका परिसर मधील महात्मा फुले नगर मधील कचरा मागील 5 दिवसात न उचल्याने मूसळधार पावसाने तो कचरा नागरिकांच्या दारात आणि काहीच्या घरात कचरा घरात घुसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत.

कल्याण पूर्व सूचकनाका परिसर मध्ये महात्मा फुले नगर आणि खदान परिसर मध्ये शेकडो बैठ्या चाळीची लोकवस्ती आहे. ते नागरिक पालिकेला कर देतात मात्र तेथील नागरिकाना पालिका सुविधा काय देते, असा सवाल केला जात आहे. शनिवार (ता. 24) पासून त्या परिसर मधील कचरा उचलला न गेल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच कालावधीत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तो कचरा पावसाच्या पाण्यासहित नागरिकांच्या दारात तर काहीच्या घरात कचरा घुसल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठी दुर्घटना, जीवित हानी झाल्यावर पालिका जागी होणार का? असा सवाल केला जात आहे.

प्रतिक्रिया
प्रत्येक वेळी नागरिकांनी तक्रारी केल्यावर पालिका कचरा उचलणार का? मागील 5 दिवस झाले आम्ही तक्रारी करतो आहे मात्र या समस्येकड़े लक्ष्य द्यायला वेळ नसून मोठी दुर्घटना झाल्यावर हे जागे होणार का? असा सवाल स्थानिक नागरिक मनोज वाघमारे यांनी केला आहे.

कल्याण पूर्व मधील प्रति दिन कचरा उचलला जातो, 5 दिवस कचरा उचलला गेला नसेल तर त्वरित काढला जाईल, कचरा का उचलला नाही याबाबत अहवाल मागितला जाईल, अशी माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी