कल्याण पालिका शिवसेनेच्या गोल्डन, सिल्व्हर गॅंगने लूटली..

रविंद्र खरात
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

कल्याण: शिवसेनेच्या गोल्डन, सिल्व्हर आणि लोखंड गॅंगने पालिका लुटली असल्याने पालिका मधील विकास कामे रखडल्याचा आरोप कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

कल्याण: शिवसेनेच्या गोल्डन, सिल्व्हर आणि लोखंड गॅंगने पालिका लुटली असल्याने पालिका मधील विकास कामे रखडल्याचा आरोप कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

कल्याण पूर्व मधील चक्की नाका ते नेवाळी फाटा रस्ता निविदा काढून ही अनेक कारणाने तो रखडला असून, तो सुरू करावा यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी उपोषणाचा इशारा देताच पालिकेने काम सुरू केले. मात्र, गेल्या आठवड्यात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर आदी पदाधिकारी वर्गाने कल्याण पूर्व मधील चक्कीनाका परिसरात कामाची पाहणी करत काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत काम थांबविले होते. त्यामुळे राजकारण तापले होते, याच धर्तीवर आज (बुधवार) आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के, भाजपा पदाधिकारी नाना सुर्यवंशी, संजय मोरे, संदीप तांबे यांच्या समवेत पालिका अधिकारी रवी राव, सुनील जोशी, प्रशांत भुजबळ, प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, बाळासाहेब जाधव आदींनी या दौऱ्यात सहभाग घेतला.

आमदार गणपत गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राजकीय दबावामुळे अनेक विकास काम रखडली आहे त्यात हा रस्ता आहे. मी 2009 मध्ये आमदार झाल्यापासून अनेक वेळा पत्रव्यवहार करून विविध कामाच्या पोलखोल करत होतो तेव्हा हे गप्प का होते? असा सवाल करत पुढे म्हणाले की, पालिकेत यांची सत्ता असून यांच्या गोल्डन, सिल्व्हर, आणि लोखंडी गॅंगने पालिकेला लुटून खालल्याने अनेक विकास कामे रखडल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी यावेळी केला. विकास कामे रखडली त्यासाठी पालिका अधिकारी जबाबदार आहेत तेवढीच राजकीय नेते जबाबदार आहेत. गोल्डन, सिल्व्हर, लोखंडी गॅंगच्या कमिशनमुळे सर्व काम रखडली आहेत, असे गायकवाड म्हणाले. यावेळी नागरिकांचे नुकसान न होता लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदार गायकवाड यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

अधिकारी आणि उपमहापौर यांच्यात शाब्दिक चकमक
मंजूर आराखडा नुसार रस्ता न करता, कमी जास्त आणि नागमोडी रस्ता बनवीत असल्याचा आरोप उपमहापौर मोरेश्वेर भोईर यांनी करत काही अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप यावेळी केला. कार्यकारी अभियंता सुनील जोशी आणि उपमहापौर भोईर यांच्यात शाब्दिक चकमक यावेळी उडाली. जोशी यांनीही उपमहापौर भोईर यांना खडेबोल सुनावल्याने त्यावेळी वातावरण चांगलेच तापले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी मध्यस्थी केली, यामुळे काहीसा तणाव शांत झाला. याप्रकरणी आमदार गायकवाड म्हणाले की, उपमहापौर मोरेश्वर भोईर यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या मागणीनुसार अधिकारी वर्गाला काम करण्याच्या सूचना दिल्याचे यावेळी आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: kalyan news kalyan municipal road issue and mp ganpat gaikwad