कल्याणमधील रस्त्यातील खड्यांमुळे तापले राजकारण

रविंद्र खरात
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

राजकारण तापले ...
खड्डे प्रकरण सध्या सोशल मीडियावर सध्या गाजत असून पालिकेत सत्ता असताना आमदार गणपत गायकवाड यांना खड्डे आणि रस्ते दुरुस्ती साठी उपोषण करावे लागते तर दुसरी कडे शिवसेनेची सत्ता असताना निकृष्ट दर्जाचे सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांना काम थांबवावे लागते यात सेना भाजपा मध्ये श्रेयाचे राजकारण आणि पालिका प्रशासन वर अंकुश नसल्याची चर्चा सोशल मीडिया वर चांगलीच रंगली आहे.

कल्याण: प्रशासनाला काम करण्याची इच्छा नाही, शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून निकृष्ट दर्जाच रस्ते दुरुस्ती करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त वेलरासू यांच्याकडे केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांना ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यात अनेक अपघात होत आहेत या पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवसापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर सहित पालिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत त्वरित दुरुस्ती काम हाती घेण्याची मागणी केली होती.

कल्याण पुर्वेकडील चक्की नाका परिसरात आज (शनिवार) सकाळ पासून पालिका प्रशासनाकडून खड्डे बुझवण्याचे काम सुरू होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, मल्लेश शेट्टी सहित शिवसेना नगर सेवकांनी आज अचानक अनेक ठिकाणी पाहणी केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी खड्डे बुझवण्यासाठी वापरण्यात येत असलेले मटेरियल नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत सदर काम थांबवले. यावेळी संतापलेल्या खासदार शिंदे यांनी अधिकरी जागेवर उपस्थित नसल्याने अशी कामे होतात या आयुक्तांचे नियंत्रण नाही आयुक्त हतबल झाले आहेत, असा आरोप केला.

चक्की नाका परिसर... खड्डे बुजवले मात्र निकृष्ट दर्जाचे...
कल्याण पूर्व मध्ये आज दुपारी चक्की नाका परिसरात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सहित पालिका पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. सदर ठेकेदार या खड्ड भरण्यासाठी नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरात असल्याचे आरोप खासदार शिंदे यांनी केला असून, खड्डा बुजविण्यासाठी माती वापर असल्याचे सांगत ते काम रोखत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी यावेळी खासदार शिंदे यांनी केली आहे.

कल्याण डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते झाले असून ते दुरुस्त न केल्याने नागरिक आम्हाला विचारत आहेत. माझ्या मागणी नुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले ते पाहण्यासाठी गेलो निकृष्ट दर्जाचे काम दिसून आले. आज काम करतील नंतर खराब झाल्यावर नागरीक आम्हाला प्रश्न करतील हा शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून, अधिकारी आणि ठेकेदार विरोधात कारवाई करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे .

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणी नुसार खड्डे बुजविण्याच्या कामाची तपासणी करू, दोषी आढल्यास निश्चित कारवाई करू, अशी माहिती पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सकाळला दिली.

Web Title: kalyan news kalyan municipal road issue and politics