रेल्वे प्रवाशांची अवस्था म्हणजे 'रोज मरे त्याला कोण रडे'

file photo
file photo

कल्याणः मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सकाळ-सायंकाळी प्रवाशाचे हाल होत आहेत. आज (गुरुवार) सकाळी 8 वाजून 35 मिनिटला विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने काही काळ सेवा विस्कळीत झाली होती. त्याला काही तास होत नाही तोच मालगाडीला सिग्नल न मिळाल्याने लांब लचक मेल लोकल गाडीच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे दुपारी 1 वाजेपर्यन्त कल्याण ते कर्जत मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. रोजची परिस्थिती असल्याने 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी अवस्था रेल्वे प्रवाश्यांची झाली आहे.

सध्या थंडीचे प्रमाण वाढल्याने सकाळच्या सत्रात धुक्याचे वातावरण असल्याने उत्तर भारतातून येणाऱ्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या उशिरा धावत आहेत. त्या कल्याण मधून पुढे काढताना लोकल गाड्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे प्रवाशी वर्ग त्रासाला असताना आज सकाळी 8 वाजून 35 मिनिटाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते कल्याण रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने काही काळ सेवा विस्कळीत झाली. दुरुस्तीचे काम काही क्षणात दुरुस्ती झाली. त्याला काही वेळ होत नाही तोच कारशेडकडे जाणाऱ्या मेल गाडीला सिग्नल न मिळाल्याने विठ्ठलवाडी ते अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान मेल आणि लोकल गाडीचे लांब लचक रांगा लागल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

बॉक्स... लेट मार्क...
आसनगावहुन 7 वाजून 35 मिनिटाला मुंबईकडे धावणारी लोकल काही महिन्यांपासून उशिरा धावणारी लोकल काही दिवसांपासून वेळेवर धावत असताना बदलापूरहुन मुंबईकडे धावणारी 10 वाजून 58 मिनिटची लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. आज ही उशिरा धावल्याने प्रवासी वर्गाचे हाल झाले होते.

मालगाडी आणि मेल गाड्या मधून रेल्वे प्रशासनाला उपन्न जास्त मिळत असल्याने सकाळच्या सत्रात कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण मार्गावर माल गाडी आणि मेल गाड्या लवकर पुढे सोडतात. यामुळे लोकल गाड्यावर परीणाम होत असल्याने समस्या प्रति दिन होते. दुसरीकडे तांत्रिक समस्या झाल्यावर तासनतास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. यासाठी कल्याण पासून पुढे मेल आणि लोकल गाड्यांचा मार्ग वेगळा करणे काळाची गरज आहे. कल्याण मधील यार्ड डेव्हलपमेंट होणे काळाची गरज असून, त्याचा पाठपुरावा करत आहे, अशी माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com