कल्याण रेल्वे स्थानकात 11 पैकी 5 एटीव्हीएम मशीन बंद

रविंद्र खरात
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कल्याण रेल्वे स्थानक मधील 11 पैकी 6 मशीन सुरु असून 5 बंद मशीन आहेत , या आठवड्यात या बंद मशीन बदलून नवीन मशीन बसविण्यात येईल अशी माहिती कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली.

कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण सहित अनेक रेल्वे स्थानकामधील तिकीट खिडक्यांवरील गर्दीची समस्या कमी करण्यासाठी रेल्वेने 'ऑटोमेटिक तिकीट व्हेडींग मशीन' (एटीव्हीएम), 'कूपन व्हॅलेडिटिंग मशीन'(सीव्हीएम)सारख्या योजना राबवल्या. तरीही, तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी झालेली नसून कल्याण सहित अनेक रेल्वे स्थानक मधील या मशीन खराब झाल्याने रेल्वे प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कल्याण रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे, प्रति दिन 5 लाखाहुन अधिक रेल्वे प्रवासी मुंबई आणि कसारा कर्जतच्या दिशेने लोकल  प्रवास करत असतात . कल्याण सहित अनेक रेल्वे स्थानक मधील तिकीटघरावरील प्रवासी कमी करण्यासाठी ऑटोमेटिक तिकीट व्हेडींग मशीन' (एटीव्हीएम), 'कूपन व्हॅलेडिटिंग मशीन' (सीव्हीएम) सारख्या योजना राबवल्या. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक तिकीट घराजवळ 11 मशीन बसविण्यात आल्या असून त्यातील केवळ 6 मशीन सुरु असून 5 मशीन बंद असल्याने प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

मध्य रेल्वेने लोकल गाड्यांमध्ये सुचना देतात एटीव्हीएम कार्ड घ्या. महिन्याचे 5 % सुट, फक्त कार्ड ठेवायचे मशीनमध्ये आणि तिकीट मिळवा त्यामुळे रांगाचा ञास नाही. यामुळे प्रवासी वर्गाने कार्ड खरेदी केले त्यात रिचार्ज ही केले मात्र कल्याण सहित अनेक रेल्वे स्थानकमध्ये 75 टक्के मशीन बंद पडल्याने प्रवाश्याना नाहक त्रास होत असल्याचा आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे.

मशीन चालविण्यास रिटायर माणसाला चालविण्यास देतात त्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्या दुरुस्त करण्यास माणसे नसल्याने या मशीन भंगार मध्ये काढल्या जातात त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या पैशाचा चुराडा होत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनाने केला असून चांगली संकल्पना वरिष्ठ अधिकारी आखतात मात्र नियोजन नसल्याने ही योजना फेल ठरली असून याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत असून यात रेल्वे प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत असून याकडे रेल्वे प्रशासन सुधारणा करणार याकडे लक्ष्य लागले आहे. 

कल्याण रेल्वे स्थानक मधील 11 पैकी 6 मशीन सुरु असून 5 बंद मशीन आहेत , या आठवड्यात या बंद मशीन बदलून नवीन मशीन बसविण्यात येईल अशी माहिती कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली.

Web Title: Kalyan news Kalyan Railway station evm machine