'केडीएमटीच्या उपन्नामधून कर्मचाऱयांच्या वेतनाचे नियोजन करा'

रविंद्र खरात
गुरुवार, 6 जुलै 2017

कल्याण: केडीएमटीच्या प्रति दिन उपन्नामधून निधी कर्मचारी वर्गाचे पगार आणि बसेस दुरुस्तीसाठी नियोजन करा, असे आदेश केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये परिवहन समितीची सभा आज (गुरुवार) संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

कल्याण: केडीएमटीच्या प्रति दिन उपन्नामधून निधी कर्मचारी वर्गाचे पगार आणि बसेस दुरुस्तीसाठी नियोजन करा, असे आदेश केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये परिवहन समितीची सभा आज (गुरुवार) संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

केडीएमटीच्या कर्मचारी वर्गाचा वेळेवर पगार होत नाही तर खराब बसेस वेळेवर दुरुस्त न झाल्याने बसेस रस्त्यावर धावत नाही, यामुळे केडीएमटीचे उपन्न घटते. प्रति दिन 5 लाखाहुन अधिक रक्कम जमा होते, त्यातून काही निधी बाजूला ठेवून कर्मचारी वर्गाचा पगार आणि बसेस दुरुस्तीवरील खर्चाचे नियोजन करण्याचे आदेश, श्री. पावशे यांनी केडीएमटी प्रशासनाला दिले.

परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमटी बस सेवा ज्या मार्गावर सुरु होत्या त्या बंद पडल्या त्या पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली. आरक्षित बसेसच्या भाड़े मध्ये सूसूत्रता आणावी अशी मागणी केली. यावेळी खासगी बसेस पेक्षा केडीएमटी च्या भाड़े दर जास्त असल्याची तक्रारी सर्व सदस्यांनी केली. सदस्य संजय राणे यांनी डोंबिवली मधील रेती बंदर ते रामनगर पोलिस स्टेशन पर्यंत केडीएमटी बस सुरु करण्याची मागणी केली, यामुळे शालेय विद्यार्थी वर्गाचा फायदा होईल, असे राणे यांनी स्पष्ट केले. सदस्य मनोज चौधरी यांनी कल्याण रेल्वे स्टेशन ते डोंबिवली रेल्वे समांतर बस सुरु करण्याची मागणी केली.

या विषयावर उत्तर देताना केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे म्हणाले, 'नवीन आणि जुन्या मार्गावर बसेस सुरु करण्याच्या मागणी वाढत आहे. मात्र, सध्या ती पूर्ण करू शकत नाही त्यासाठी बसेस दुरुस्ती आणि डायव्हर बाबत निविदा काढण्यात आली असून त्याला प्रतिसाद मिळेल.  संबधित ठेकेदार नेमणूक करून या मागण्या पूर्ण केल्या जातील.'

मुंबई

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM

कल्याण : चक्क बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे'...

04.00 PM