उद्या एकादशी मात्र आजच विठोबाचे दर्शन झालेः रामनाथ सोनावणे

रविंद्र खरात
सोमवार, 3 जुलै 2017

कल्याणः शासकीय सेवेत असताना मला भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये मी देव पाहिला, त्याच्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि वाईट गोष्टी सोडून दिल्या. प्रत्येक जण समस्या घेवून यायाचा आणि मी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले. माझा अपघात झाला तेंव्हा केडीएमटी कर्मचारी वर्ग आपल्या कुटुंबासहित टिटवाला गणपतीकडे पायी चालत जात साकडे घातले त्यामुळे त्यांचे माझे एक वेगळे नाते असून, उद्या एकादशी आहे. मात्र आजच मला केडीएमटीच्या प्रत्येक कर्मचारी मधील विठोबाचे दर्शन झाले, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगर पालिका माजी आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी कल्याण मधील कार्यक्रमामध्ये केले.

केडीएमटी उपव्यस्थापक, कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त आणि नागपुर महानगर पालिका अतिरिक्त पदावर काम केलेले रामनाथ सोनावने हे 30 जून 2017 रोजी शासकीय सेवेतुन निवृत्त झाले. त्या निमित्त कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट येथील आगार मध्ये सर्व केडीएमटी कर्मचारी वर्गाने आज (सोमवार) दुपारी भव्य सत्कार केला. यावेळी केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे, सभापती संजय पावशे आणि सर्व परिवहन समिती सदस्य व्यासपीठवर होते. केडीएमटीचे देवदूत रामनाथ सोनावने यांचा जाहिर सत्कार झाल्यानंतर आपल्या भाषणात रामनाथ सोनावणे यांनी सत्कार प्रति आभार मानत कर्मचारी वर्गाला आवाहन करत म्हणाले की, एका महिन्यात 6 च्या ऐवजी 11 लाख उपन्न वाढविले तर मला अभिमान वाटेल. केडीएमटी आपली आई आहे, तिचे सरंक्षण करने प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगत काम करतो, त्यानेच समाजात मान मिळतो असे यावेळी स्पष्ट केले .

पालिकेच्या कर्मचारी वर्गाला पडला विसर....
केडीएमटी कर्मचारी वर्गाने ढोल ताशाच्या गजरात पालिका माजी आयुक्त रामनाथ सोनावने यांचा सत्कार केला. मात्र. पालिकेच्या कर्मचारी आणि वर्गासाठी अनेक काम रामनाथ सोनावणे यांनी काम केले असताना त्यांना विसर पडल्याची चर्चा पालिका वर्तुळात चांगलीच रंगली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​