केडीएमटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस अद्याप नाहीच...

रविंद्र खरात
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

कल्याणः कल्याण डोंबिवली महानगर पालिका कर्मचारी प्रमाणे केडीएमटी कर्मचाऱ्याना दिवाळी बोनस जाहीर झाला होता. मात्र, दिवाळी संपवून ही ती रक्कम केडीएमटी कर्मचाऱ्यांना न दिल्याने संतापाचे वातावरण आहे. बुधवारी (ता. 8) दुपारी केडीएमटी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका कर्मचारी अधिकारी समवेत शिक्षण मंडळ आणि परिवहन उपक्रम मधील कर्मचाऱ्याना दिवाळी बोनस म्हणून सुमारे 12 हजार रुपये जाहीर झाले होते. त्याचा रितसर मागील महिन्यात पालिकेच्या महासभेत प्रस्ताव ही मंजूर झाला होता. पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस रक्कम मिळाली. मात्र, केडीएमटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस रक्कम न दिवाळी झाली तरी रक्कम न मिळाल्याने कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी 3 वाजता केडीएमटी गणेशघाट डेपोच्या बाहेर कर्मचारी वर्गाची गेट बैठक होणार असून, त्यात पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे.

अहोरात्र परिवहन कर्मचारी वर्ग मेहनत करतो मात्र कधी पगार नाही तर कधी विमाचे पैसे नाही. आता तर दिवाळी झाली तरी बोनसची रक्कम दिली नाही. उद्या कर्मचारी वर्गाची बैठक घेऊन केडीएमटी बंद का धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मजदूर युनियन अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :