कल्याण: खोणी ग्रामपंचायतीवर फुलले कमळ; सेनेच्या वर्चस्वाला धक्का

मयुरी चव्हाण काकडे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कल्याण: बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीसाठीचे मतदान आज (सोमवार) पार पडले. गेली अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीवर सेनेचे असलेले वर्चस्व मोडीत काढत भाजपाने येथे कमळ फुलविले असून भाजपाचे सदस्य हनुमान ठोंबरे यांच्या गळयात सरपंचपदाची माळ पडली आहे. एकूण 11 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 7 सदस्यांनी भाजपाला तर 2 सदस्यांनी शिवसेनेला मतदान केले. उर्वरित दोन सदस्यांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. विशेष म्हणजे अनुपस्थित असलेले दोन्हीही सदस्य शिवसेनेचे असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खोणी ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी शिवसेनेचे 6 तर भाजपाचे 5 सदस्य आहेत. सेनेचे सरपंच अबीर दातीलकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आज दुपारी खोणी ग्रामपंचायतीत मतदान पार पडले. भाजपाचे 5 सदस्य असूनही 7 मत भाजपच्या पारड्यात पडल्याने सेनेचे दोन सदस्य आपल्याकडे वळविण्यात भाजपने यश मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खोणी ग्रामपंचायतीवर विजय मिळवून ग्रामीण भागात असलेल्या सेनेच्या वर्चस्वाला भाजपाने एकप्रकारे धक्का दिला आहे. यावेळी केडीएमसीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजपचे नगरसेवक महेश पाटील, कल्याण जिल्हासरचिटणीस शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

भाजपाला विजयाची खात्री असल्याने सकाळपासूनच भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खोणीच्या दिशेने हारतुरे घेऊन जात होते. तर सेनेचा एकही पदाधीकारी निवडणुकीच्या वेळी उपस्थित नसल्याने निवडणुकीपूर्वीच सेनेने पराभव मान्य केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

* सेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सोमवारी खोणी गावात मोठया प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
* खोणी ग्रामपंचायत निवडणूक ही येत्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याची बाब डोळ्यासमोर ठेवून भाजपाने यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

मुंबई

नवी मुंबई  - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दुपारपासून नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली...

08.09 PM

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM