चिनी कंपन्यांना कामे दिली जाऊ नयेत: आमदार पवार

सुचिता करमरकर
गुरुवार, 13 जुलै 2017

पक्षाच्या महिला आघडीने चीनी वस्तूंच्या बहिष्कारासाठी केलेल्या निदर्शनांनंतर पवार बोलत होते. यापूर्वी सरकारने काही चीनी कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत.

कल्याण : सरकारच्या लक्षणीय प्रयत्नांमुळे राज्यातील परदेशी गुंतवणकीत वाढ होत आहे. मात्र यात भविष्यात चिनी कंपन्यांना कामे दिली जाऊ नयेत अशी भूमिका कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी मांडली.

पक्षाच्या महिला आघडीने चीनी वस्तूंच्या बहिष्कारासाठी केलेल्या निदर्शनांनंतर पवार बोलत होते. यापूर्वी सरकारने काही चिनी कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत. मात्र मागील काही दिवसात चीनने देशाच्या सीमेवर घूसखोरीचे जे प्रयत्न केले आहेत, त्याचा विचार करुन आपण ही भूमिका मांडत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

यासाठी आपण संबंधित मंत्री तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधू असे त्यांनी सांगितले. यासाठी पक्षात दबाव गटही तयार करु असे ते म्हणाले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: