नागरिकांनो, बिनधास्त खा अंडीः सुरेश देशमुख

रविंद्र खरात
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

कल्याणः प्लास्टिकची अंडी, चीनी अंडी, अंडयात प्लास्टिक निघाले अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. तीन ठिकणांहून ताब्यात घेतलेल्या अंड्यांची तपासणी करण्यात आली होती. अहवालामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून न आल्याने नागरिकांनी बिनधास्त अंडी खावीत, असे आवाहन अन्न व औषध कोकण विभाग कोकण सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

अन्न व औषध ठाणे विभागाच्या पथकाने डोंबिवली, कल्याण आणि वसई-विरार परिसरात तक्रारदार आणि त्यांनी ज्या दुकानमध्ये अंडी खरेदी केली ती पाहणी करत 3 ठिकाणचे अंडी ताब्यात घेतली होती. मुंबई येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेत ती तपासणीसाठी पाठविली होती. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या अंड्यांमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. यामुळे नागरिकांनी अफवावर विश्ववास न ठेवतात बिनधास्त अंडी खावीत, असे आवाहन सुरेश देशमुख यांनी केले आहे.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि वसई-विरारमध्ये प्लास्टिक अंडी, अंड्यामध्ये प्लास्टिक पदार्थ निघाला, चीनी अंडी बाजारात असल्याच्या बातम्या विविध दैनिकात एप्रिल मे महिन्यात प्रसिध्द झाल्या होत्या. त्यावेळी अन्न व औषध विभागाच्या कामकाजावर टिकाही झाली होती. याची दखल घेत अन्न व औषध कोकण विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याधर्तीवर अन्न व औषध ठाणे विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या  पथकाने सोमवारी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, वसई विरार मधील तक्रारदाराने दिलेली अंडी आणि त्याने खरेदी केलेल्या डोंबिवली आणि कल्याण शिळफाटा रस्त्यावरील अंडी वितरण करणाऱ्या दुकानाना भेटी देत काही अंडी आपल्या ताब्यात घेतली. ती तपासणीसाठी अन्न चाचणी प्रयोग शाळा मुंबईकड़े पाठविले होते. तब्बल एक आठवड्यात त्याचा अहवाल आला असून, त्यात काही संशयास्पद अथवा आक्षेपार्ह नसल्याचे अहवाल म्हटले आहे. सुरेश देशमुख यांनी एका व्हिडिओ मार्फ़त नागरीकांशी संवाद साधत अफवावर विश्ववास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.