कल्याण ते कसारा दरम्यान वाढले रेल्वे अपघात

Duranto Express
Duranto Express

कल्याण : कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाड़ी, मेल गाड़ी इंजिन थांबणे, मेल गाडीचे इंजिन घसरले आज तर आसनगाव येथील रेल्वे स्थानकाजवळ नागपुर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस अपघात हा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या हलगर्जी पणामुळे झाला असून या अधिकारी वर्गाचे राजीनामे घेवून त्यांना घरी पाठवा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढली त्यामुळे मध्य रेल्वेचे उपन्न वाढले मात्र सुविधा केवळ कागदावरच आहे. सुविधा आणि समस्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाच्या माध्यमातून रेल्वे अधिकारी वर्गाकडे मांडल्या. मात्र अधिकारी वर्गाने नेहमीच कानाडोळा केला जात असून मोठी जिवितहानी झाल्यावर यांचे डोळे उघड़े होणार का असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनाकडून केला जात आहे. आसनगांव पुढे आटगांव भागात औद्योगिक वसाहत, अभियांञिक महाविद्यालय, शाळेवर जाणारे शिक्षक, पोतदार, संघवी हाऊसिंग कॉम्प्लेक्स, खर्डी येथे दोन मोठ्या नामांकित कंपन्या, अजमेरा गृहसंकुल, कसारा येथे पॉलिटेक्निक महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या अत्यावश्यक सेवेला कल्याण ठाणे भागातून जाणारा कर्मचारी वर्ग शिवाय कसारा भागातून मुंबईकडे दैनंदिन प्रवास करणारे पन्नास हजाराच्या वरील किमान प्रवासी जे दुध, भाजीपाला, मासळी विक्रेते, महाविद्यालयीन मुले मुली ठाणे मुंबईला ये-जा करतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे.

रेल्वे समांतर रस्ता खर्चिक असल्याने रेल्वे एकमेव पर्याय असल्याने प्रवासी लोकल आणि मेल गाड़ीने प्रवास करतात. प्रवासी संख्या वाढली, उपन्न वाढले मात्र रेल्वे प्रशासन ने कल्याण ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी वर्गाची उपेक्षाच केली आहे. कल्याण पुढे मुंबईच्या दिशेने लोकल सेवा विस्कळीत झाल्यावर त्याचा सर्वात जास्त फटका कल्याण ते कसारा दरम्यान रेल्वे प्रवासी वर्गाला बसत आहे. कल्याण ते कसारा दरम्यान दरवर्षी मुसळधार पाउस पड़त असतो. त्यामुळे रेल्वे स्थानकामधील दुरुस्ती, रेल्वे रुळाची तपासणी करत डागडुजी करावी अशा अनेक मागण्या केल्या मात्र याकडे रेल्वे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष्य केले. त्यामुळे आज दुर्घटना घडली याला जे रेल्वे अधिकारी जबाबदार आहेत त्यांचा राजीनामा घेवून त्यांना घरी पाठवा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे केली आहे.

या मार्गावर एक रेल्वेने रूग्णालय सूरू करावे व महत्त्वाच्या स्थानकांवर कसारा, वासिंद, टिटवाळा व शहाड येथे रुग्णवाहिका उपलब्ध करावी ही मागणी गेली २ वर्ष सातत्याने डिआरएम, सिनियर डिसीएम व ओएसडी या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे रेल्वे प्रवासी संघटनाने केली. मात्र याला केराची टोपली दाखविल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे.

मागील काही दिवसात घड़लेल्या घटना 
- 25 जून - टिटवाळा स्थानकात मुसळधार पावसाने रूळांमध्ये पाणी भरले ..कल्याण कसारा वाहतुक 4 तास बंद होती.
- 27 जून - खर्डी -कसारा दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल. सकाळी 11.45 ...वाहतुक 2 वाजुन 5 मिनिटाला सुरु झाली, नविन इंजिन आल्यावर
- 27 जून - वासिंद -आसनगांव दरम्यान डाऊन मार्गावर कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनात तांञिक बिघाड दुपारी 3 वाजुन 30. सायंकाळी 5 पर्यंत अप आणि डाऊनची वाहतुक ठप्प होती
- 28 जून - आसनगांव पोल नं 84 येथे मालगाडीच्या इंजिनात बिघाड सकाळी  11.22 मि. कल्याण ते कसारा अप आणि डाऊन वाहतुक ठप्प ..नविन इंजिन आणल्यावर वाहतुक दुपारी  2 वाजुन 17 मिनीटांनी सुरू  
- 30 जून - कल्याण येथे क्रासिंगला मंगला एक्सप्रेसचे इंजिन दुपारी 2 वाजुन 20 रूळावरून घसरले ते 4 वाजुन 17 मिनिटला कल्याण रेल्वे स्थानक मध्ये रवाना . यावेळी ही कसारा आणि कल्याण दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती 

आज मंगळवार ता 29 ऑगस्ट रोजी सकाळी आसनगाव रेल्वे स्थानक जवळ मेल गाड़ीचे डब्बे घसरले अश्या अनेक घटने मुळे अनेक प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून आता तरी रेल्वे प्रशासन जागे होणार का असा सवाल केला जात असून कल्याण ते कसारा दरम्यान नागरिक राहतात जनावरे नाही असा संताप रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे .

मागील अनेक दिवसापासून रेल्वे प्रशासन कडे कल्याण ते कसारा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सूखकर व्हावा यासाठी रेल्वे अधिकारी वर्गाची भेट घेवून अनेक मागण्या केल्या , कल्याण ते कसारा दरम्यान पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील दुरुस्तीची काम हाती घ्यावी , सुविधा दया मात्र अधिकारी वर्ग लक्ष्य देत नव्हते त्याचा फटका आज बसला , आता तरी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी काम चुकार अधिकारी वर्गाला घरी पाठवावे अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com