रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रशासनाने राबवली स्वच्छता मोहिम

रविंद्र खरात
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कल्याण : टिटवाला, अंबिवली, आणि शहाड रेल्वे स्थानकमध्ये कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासन सोबत स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी जागो जागी घाणीचे साम्राज्य होते, त्या रेल्वे स्थानकामध्ये सफाई कर्मचारी कमी असल्याने त्यांची संख्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासन कडे करणार आहे.

कल्याण : टिटवाला, अंबिवली, आणि शहाड रेल्वे स्थानकमध्ये कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासन सोबत स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी जागो जागी घाणीचे साम्राज्य होते, त्या रेल्वे स्थानकामध्ये सफाई कर्मचारी कमी असल्याने त्यांची संख्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासन कडे करणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला दाद देत मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकामध्ये 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून आज रविवार ता 20 ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासन आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाच्या वतीने टिटवाला, आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानकमध्ये स्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आली. यात रेल्वे स्थानक प्रबंधक ,रेल्वे स्वच्छता कर्मचारी ,आरपीएफ व जिआरपी पोलिस यांनी सहभाग घेतला यात प्रवासी संघटनाचे राजेश घनघाव, श्याम उबाळे, विजय देशेकर राहुल दोंदे, चंद्रकांत जाधव, अन्वर मणियार अनिल ञिपाठी, रमन तरे, संदीप पाटील, कैलास विभुते, श्रीकांत उबाळे यांच्या समवेत 40 जणांनी सहभाग घेतला यात काही प्रवाश्यानी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिम प्रत्यक्षात सुरू करण्याआधी काल मुझफ्फरनगर जवळ कलिंगा -उत्कल एक्सप्रेसच्या आपघातामध्ये निष्पाप बळी गेलेल्या मृत रेल्वे प्रवासी बांधवांना श्रद्धांजली वाहिली .

स्वच्छता मोहिमेच्या वेळी रेल्वेस्थानकात प्रवाशांना स्थानक परिसर स्वच्छ राखण्याकरिता सतत उद्घोषणा सुरू होत्या .स्थानकातील परिसर ,रेल्वे रूळांमधील कचरा व फलाटांवरील साफसफाई करीत असताना दारूच्या बाटल्या ठिकठिकाणी आढळल्या हे उपस्थितीत आरपीएफ व जिआरपी पोलिस यांना सुचना करण्यात आल्या कि या प्रकाराला ताबडतोब प्रतिबंध करा  शिवाय फलाटांवरील कचरा हा या स्थानकातील फेरीवाले व उपहारगृह  परिसरात जास्त प्रमाणात आढळला .त्यांना संघटनेतर्फे  विनंती करण्यात आले कि आपण कचरा कुंडी ठेवाव्यात व वस्तु विकताना प्रवाशांना कचरा  हा कचरा कुंडीत टाकण्याचे आवाहन करा , स्थानक प्रबंधक यांना संघटनेतर्फे  विनंती करण्यात आली कि यावर नियंञण ठेवण्याकरिता या विक्रेत्यांवर यात सुचनांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसुली करा अशी मागणी यावेळी करण्यात आली 

तिन्ही रेल्वे स्थानक मध्ये सफाई कर्मचारी कमी आहेत, प्लास्टिक पिशवी, आणि प्लास्टिक बाटल्या सोबत दारुच्या खाली बाटल्या सापडणे ही गंभीर बाब असून याबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गाची भेट घेवून समस्या मांडणार असल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दिली.