कल्याण: विद्यार्थीनींनी जवानांना पाठविल्या शेकडो राख्या

रविंद्र खरात
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालयात आज (गुरुवार) भारतीय सैनिकांकरीता सैनिक हो तुमच्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विद्यालयामधील चौथी ते दहावीच्या 290 मुलीनी सहभाग घेतला होता.

कल्याण : जम्मू काश्मीरच्या भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांना सम्राट अशोक विद्यालयामधील शेकडो विद्यार्थीनींनी शुभ संदेश असलेल्या शेकडो राख्या पाठवून एक आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. 

कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालयात आज (गुरुवार) भारतीय सैनिकांकरीता सैनिक हो तुमच्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विद्यालयामधील चौथी ते दहावीच्या 290 मुलीनी सहभाग घेतला होता.

रक्षाबंधनानिमित्त राखीवर शुभ संदेश लिहण्यात आले. भारतीय डाकच्या माध्यमातुन त्या राख्या जम्मू काश्मीरमधील भारतीय सैनिकाना पाठविण्यात येणार आहे. यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी अल्पेश दगडे काश्मीर श्रीनगर येथे सैनिक आहे. आज आमच्या शाळेच्या विध्यार्थ्यांबरोबर भ्रमणध्वनी वरुन संवाद साधला आणि काश्मीर मधील वातावरणाची माहिती दिली तर प्रमुख पाहुणे कोळशेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निळकंठ पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था अध्यक्ष पी. टी. धनविजय, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, सुजाता नलावड़े आदी मान्यवर उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :