कल्याण पूर्वमधील स्कायवॉकची रडकथा

skywalk in kalyan
skywalk in kalyan

कल्याण : कल्याण पूर्वमधील नागरिकासाठी स्टेशन पर्यंत जाता यावे यासाठी रेल्वे, एम एम् आरडी, आणि पालिका यांच्या माध्यमामधून बांधण्यात आलेल्या अर्धवट स्कायवॉकमुळे कल्याण पूर्व मधील नागरिकांना पावसाच्या साठलेल्या गुडघाभर पाण्यातुन वाट काढत रेल्वे स्थानक गाठावे लागत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. 

कल्याण पूर्वमधील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठताना अनेक समस्याना सामोरे जावे लागत होते, स्टेशन गाठताना  रेल्वे यार्ड, दोन बोगदे यातून प्रवास करावा लागत होती, पावसाळ्यात तर या मार्गावर पानी साचलेले तर चिखल यातून वाट काढावी. तर सायंकाळी 7 नंतर अंधार तर यार्ड असल्याने तेथे 4 रुळ मार्ग आहेत तेथून मालगाड्या जातात. सिग्नल न मिळाल्याने 10 ते 15 मिनिट इंजिन आणि मालगाडी थांबत असल्याने नागरिक आपला जिव मुठित ठेवून प्रवास करतो तर लवकर जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मालगाडीच्या दोन डब्यातील जागेतुन वाट काढत कधी खालून निघत असतात. वेळ प्रसंगी अपघात ही होतात तर जे बोगदे आहेत, मात्र पावसाळ्यात त्यातील लाइट गुल तर त्यातून ही पानी झिरपत असून पावसाचे ही पानी साचत असल्याने त्यातून वाट काढत घर किंवा स्टेशन गाठावे लागत होते. 

दरवर्षीची समस्या पाहुन कल्याण डोंबिवली महानगरपालिका, एमएमआरडी आणि रेल्वेच्या माध्यमामधून स्कायवॉक बांधण्यात यावा. यासाठी सन 2009 मध्ये  सुमारे 32 कोटी ला मंजूरी मिळाली मात्र प्रत्यक्ष हे काम 2011 मध्ये सुरु झाले. मात्र पहिल्या टप्यात कल्याण रेल्वे स्थानक ते कल्याण सिद्धार्थ नगर असा, स्कायवाक़ पूर्ण होवून ही नागरिकांना खुला न झाल्याने कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड़ यांचे उपोषण, स्वराज्य सामाजिक संघटनाचा मेणबत्ती मोर्चा, आप पार्टी कार्यकर्ता आंदोलन यांच्या मुळे तो काही महिन्यापूर्वी नागरिकांना तो स्कायवॉक़ खुला झाल्यावर दिलासा मिळाला. 

मात्र दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौक रिक्षा स्थानक रिक्षा स्थानक अर्धवट स्कायवाक़ राहिल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे, काही दिवसापूर्वी नागरिकांना स्कायवाक़ नसल्याने गुड़घ्याभर पावसाच्या पाण्यात रेल्वे स्थानक गाठावे लागले.

कसा आहे हा स्कायवॉक
कल्याण स्टेशन ते सिद्दार्थ नगर व्हाया गणपती चौक याच प्रमाणे कल्याण स्टेशन मध्ये मधला मोठा पुल ते कल्याण पूर्व मधील तिकीट घर स्कायवॉकला जोडला जाईल असा स्कायवॉक आहे. पहिल्या टप्यातील 640 मीटर चा कल्याण रेल्वे स्थानक ते कल्याण पूर्व सिद्दार्थ नगर स्कायवॉकच्या कामाला 2009 मध्ये सुरु झाला याचा आज पर्यंत 20 कोटी खर्च झाला असून एकूण 32 कोटी खर्च मंजूर असून काही महिन्यापूर्वी पहिल्या टप्यातील कल्याण रेल्वे स्थानक ते कल्याण पूर्व सिद्दार्थ नगर पूर्ण झाला तो जन आंदोलन नंतर खुला झाला. मात्र दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौक रिक्षा स्थानक असा अर्धवट स्कायवॉक असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप करावा लागत आहे. कल्याण पूर्व मधील नागरिकांचा वनवास कधी संपणार असा सवाल केला जात आहे.

एकही प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल पालिका अधिकारी वर्गाला पुरस्कार दिला पाहिजे , शासनाचा निधी आणून ही पालिका अधिकाऱ्यांच्या आड़मुठ्या धोरणामुळे तो परत ही गेला आहे. स्कायवॉक ही रखड़ला आहे तो अधिकारी वर्गामुळे , आता किती पाठपुरावा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार गणपत गायकवाड़ यांनी व्यक्त केली आहे.

पहिल्या टप्यातील स्कायवॉक पूर्ण झाला असून सिद्धार्थनगर ते गणपती चौक हा अर्धवट स्कायवाक़ मार्च 2018 पर्यंत नागरिकांना खुला केला जाईल अशी माहिती पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com