कल्याण: स्पेशल बर्फीच्या नावाने बनावट मावाची तस्करी

kalyan sweets
kalyan sweets

कल्याण : रक्षाबंधन ते दिवाळी हे सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यात मिठाईसाठी कल्याण, घाटकोपर आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथे भेसळयुक्त बनावट मावा यावर्षीही दाखल झाला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व औषध विभाग अधिकारी आणि व्यापारी वर्गावर कारवाई करावी अशी मागणी कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठे मोठे बॉयलर असलेले प्लांट आहेत. मोठ्या मशनरी असल्याने मोठ्या प्रमाणात तेथे मावा बनवून पुढे तो रेल्वेच्या माल डब्यात पाठविले जातो. तर तेथे कारवाई झाल्यास टुर एंड ट्रॅव्हल्सच्या मोठ्या बसेस मधून तो घाटकोपर आणि कल्याणमध्ये मावा पाठवला जातो. कल्याणमध्ये सर्वात जास्त 40 पेक्षा जास्त व्यापारी असल्याने राज्यात कल्याण एक नंबरवर असून दोन नंबर घाटकोपर आणि तिसऱ्या क्रमांकावर पुणे शहर आहे .

भेसळयुक्त मावा व्यवसायाला 1992 पासून सुरुवात झाली. यात मध्य प्रदेशमधील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. हा व्यवसाय रक्षाबंधन ते दिवाळीपर्यंत चालतो. या दरम्यान एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाते. हा माल प्रतीदिन हजारो किलो बनावट मावा पाठवला जातो. कल्याणमधील पिसवली, टाटा पावर कोन गाव, नेतवली आणि कल्याण रेल्वे परिसरामधील झोपड़पट्टीमध्ये ठेवला जातो. रात्री अकरा नंतर किंवा पहाटे हा खेळ चालतो. यावेळी बनावट मावा शिप्ट करण्याचा काम सुरु राहते. मात्र यावर बंदी कधी येणार याकडे लक्ष्य लागले आहे.

या बनावट मावा बाबत मागील वर्षी दैनिक सकाळ ने पोलखोल करताच सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील यांनी कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड़ यांच्या माध्यमातुन राज्य सरकारचे लक्ष्य वेधले असता अन्न व औषध विभागामार्फ़त कल्याण डोंबिवली मध्ये छापे टाकण्यात आले होते. यावर्षी हा बनावट मावा येणार नाही असे अपेक्षित होते मात्र सण सुरु होताच कल्याणमध्ये हा बनावट मावा अन्न व औषध विभाग आणि काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद मुळे दाखल झाला असून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारी आणि व्यापारी वर्गावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे .

मागील काही दिवसात प्रत्येक शहरात व्यापारी वर्गाची बैठक घेवून सूचना दिल्या होत्या. सणामध्ये भेसळयुक्त पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणुक केली असून प्रत्येक शहरात आगामी दिवाळी पर्यंत ही धड़क कारवाईचे आदेश दिले असून नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास हेल्प लाइन वर कळवावे नाव गुपित ठेवले जाईल अशी माहिती अशी माहिती अन्न व औषध विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com