कल्याण रेल्वे स्थानक बाहेर रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या बेशिस्तपणामुळे आला बकालपणा 

kalyan
kalyan

कल्याण - रेल्वे स्थानक परिसरमध्ये अवैध रित्या रिक्षा आणि टॅक्सी अनेक तास उभे राहत जागा अडवून ठेवल्याने रेल्वे प्रवाश्याना रेल्वे स्थानकमध्ये जाताना आणि बाहेर पडताना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे परिसरही बकाल होत असून, यावर वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभागाने कठोर निर्णय घेऊन परिसर मोकळा करून द्यावा अशी मागणी रेल्वेने केली आहे.

महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा कल्याण रेल्वे स्थानकात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून रेल्वे स्टेशन अंतर्गत स्वच्छतेला महत्व दिले जात आहे . दरम्यान मध्य रेल्वेचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा , विभागीय व्यवस्थापक संजय जैन यांनी मागील महिनाभर अनेक वेळा कल्याण रेल्वे स्थानकाचा दौरा करत स्वच्छतेला महत्व देण्याचे आदेश देत स्टेशन बाहेर असलेला बकालपणा दूर करण्याचे आदेश दिले होते , याधर्तीवर रेल्वे अधिकारी वर्गाने एक पत्र वाहतूक पोलिस आणि आरटीओला पत्र पाठविले असून कल्याण रेल्वे स्थानक बाहेर असलेला रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या बेशिस्त पणाकडे लक्ष्य वेधले असून त्यामुळे रेल्वे प्रवाश्याना त्रास असल्याचे लक्ष्य वेधले आहे

रेल्वेने पाठविलेले पत्रानुसार कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा चार लेनमध्ये दोन्ही दिशेला उभ्या असतात त्यामुळे हे रिक्षावालेच अर्ध्याहून अधिक मुख्य रस्ता अडवून उभे असतात .त्यांनी एकाच दिशेला किमान दोन रांगेत रिक्षा उभ्या केल्या व भाडे घेऊन निघताना एकाच दिशेने निघून वाहतुक नियंञण नियमावली पाळली वाहतुक कोंडी टाळता येईल .तर रिक्षा रेल्वे स्थानक परिसर व तिकिट बुकींग कार्यालयाजवळ तासनतास उभ्या असतात त्यांना केवळ या परिसरात प्रवासी भाडे नेण्याकरिता वा सोडण्याकरिता चार ते पाच मिनिटे परवानगी द्यावी ,कल्याण तिकिट आरक्षण केंद्राजवळ सध्या पाच लेन मध्ये रिक्षा उभ्या असतात त्यांना केवळ 2 लेनमध्येच उभ्या करणे बंधनकारक करावे , कल्याण एस्केलेटरला लागून रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अनधिकृतपणे जागा व्यापली आहे ती जागा ताबडतोब मोकळी करून ती प्रवाशांना वापरात यावी ,जेणेकरून प्रवासी तेथे गाड्यांची प्रतिक्षा करण्याकरिता त्या जागेचा मोकळेपणाने वापर करतील. नविन रेल्वे आरक्षण केंद्राजवळ रिक्षावाल्यांनी सध्या तीन रांगा लावून ती जागा व्यापून घेतली आहे त्या ठिकाणी एकच रांग बनविली तर ती जागा प्रवाशांना वापरण्याकरिता मोकळी होईल .आदी मागण्या रेल्वेने आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे केली असून आता दोन्ही विभाग कारवाई करेल का याकडे लक्ष्य लागले आहे .

रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा आणि टॅक्सी यांनी बेकायदा पार्किंग केल्याने प्रवाश्याना त्रास होतो या प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार रेल्वेने हालचाल सुरू केली आहे. वाहतूक पोलिस कारवाई ही करते मात्र ती तात्पुरती करते त्यात सातत्य हवे. आणि कायमचा तोडगा काढावा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना श्याम उबाळे यांनी केली आहे . 

रेल्वेचे पत्र प्राप्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षाबल आणि रेल्वे अधिकारी वर्गाची बैठक घेऊन एक सर्वे करून तोडगा काढला जाईल अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली . 

बकालपणा दूर करा याबाबत आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना पत्र दिले असून त्यांनी तोडगा काढावा , रेल्वेच्या हद्दीत अतिक्रमण झाले आहे ,ते दूर करण्यासाठी लवकरच कारवाई हाती घेतली जाईल अशी माहिती कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com