करिना कपूरच्या प्राप्तिकराची माहिती "हॅक' करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - अभिनेत्री करिना कपूरच्या प्राप्तिकराची माहिती "हॅक' करणाऱ्याला सोमवारी (ता. 2) सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपी निमलष्करी दलातील आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. आरोपीला करिना कपूरशी मोबाईलवर बोलण्याची इच्छा होती. त्याकरताच त्याने हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलिसांना चौकशीत सांगितले. 

आरोपीला प्राप्तिकर ऑनलाइन संकेतस्थळावर अपलोड करण्याची माहिती होती. त्याला करिनाचा मोबाईल क्रमांक मिळत नव्हता. नोव्हेंबरमध्ये करिनाचे फायलिंग खाते हॅक झाल्याची तक्रार तिच्या चार्टर्ड अकाउंटंटने सायबर पोलिसांकडे केली होती. अज्ञात व्यक्तीने करिनाचे 2016-17 चे प्राप्तिकर विवरणपत्र भरत असल्याचे भासवले. तिचे उत्पन्न वास्तवापेक्षा कमी असल्याचे दाखवून ते प्राप्तिकर विभागाकडे "ई फायलिंग' करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. दोन महिने पोलिस या प्रकरणात प्राप्तिकर विभागाकडून सतत माहिती घेत होते. दुसऱ्या राज्यातून इंटरनेटवरून हे केले जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरून सोमवारी आरोपीला अटक करण्यात यश आले. 

आरोपीने तिचा पॅन कार्ड क्रमांक इंटरनेटवरून मिळवला होता. ई-इंटर मेडिएटर या सॉफ्टवेअरचा वापर करून ई-फायलिंग केले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. 

मुंबई

कोपरखैरणे  - नवी मुंबई परिसरात साखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना नेरूळ ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाख...

12.27 AM

मुंबई - कला व विज्ञान शाखेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने कायदा विषयाचा निकाल लवकर लावण्यावर लक्ष केंद्रित...

12.12 AM

मुंबई : प्रदूषण नियंत्रण आणण्याचे आव्हान खूप मोठे आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017