शोध प्रचार कार्यालयांचा 

मयूरी चव्हाण - काकडे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 5 जानेवारी 2017

डोंबिवली - निवडणुकांच्या तोंडावर ठिकठिकाणी अचानक प्रकट होणारी विविध राजकीय पक्षांची हायटेक प्रचार कार्यालये पाहिली की, सामान्य नागरिक आश्‍चर्य व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत. आता ठाणे आणि मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने प्रचाराचा अविभाज्य घटक असलेल्या प्रचार कार्यालयांच्या शोधार्थ राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. 

डोंबिवली - निवडणुकांच्या तोंडावर ठिकठिकाणी अचानक प्रकट होणारी विविध राजकीय पक्षांची हायटेक प्रचार कार्यालये पाहिली की, सामान्य नागरिक आश्‍चर्य व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत. आता ठाणे आणि मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने प्रचाराचा अविभाज्य घटक असलेल्या प्रचार कार्यालयांच्या शोधार्थ राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. 

निवडणुका आल्या की, सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार व इतर नेतेमंडळींवर उमेदवारांच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी असते. उमेदवाराचा आणि पक्षाचा प्रचार करण्याचे महत्त्वाचे अंग म्हणजे प्रचार कार्यालय. त्यामुळेच निवडणुका आल्या की, पक्षाचे प्रचार कार्यालय उभारण्याची लगबग सुरू होते. मोक्‍याच्या ठिकाणी आपल्याच पक्षाचे प्रचार कार्यालय असावे यासाठी राजकीय पक्षांमध्ये अनेकदा रस्सीखेच होत असते. यंदाच्या पालिका निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून पालिकेच्या रणसंग्रामाची रंगतही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या राजकीय पक्ष शहरात कोणकोणत्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रचार कार्यालये थाटायची, याची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. 

प्रचार कार्यालयांची वैशिष्ट्ये : 
* मुख्यत्वे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 
* जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करता येईल अशा जागा 
* साधारण एक-दोन महिन्यांच्या करारानुसार भाडेतत्त्वावर 
* प्रचार कार्यालयात टोप्या, झेंडे, मफलर, टी-शर्ट, बॅच ठेवतात 
* साधारण सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत ही कार्यालये सुरू असतात. 
* कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी एक-दोन कार्यकर्त्यांवर. 
* चहापानापासून ते जेवणापर्यंतची सोय केली जाते 
* हायटेक प्रचार कार्यालयांचा उमेदवारांकडून हट्ट 
* आधुनिक कार्यालयात लॅपटॉप आणि इंटरनेटची सुविधाही 

येथे आखली जाते प्रचाराची रणनीती 

* प्रचारासंदर्भात सगळे महत्त्वाचे निर्णय प्रचार कार्यालयातून घेतले जातात. पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी एकमेकांशी सल्लामसलत करून प्रचाराची पुढील दिशा ठरवतात. 
* दररोज शहरात कोणकोणत्या विभागात कसा प्रचार करायचा, याकरिता कार्यकर्त्यांचे गट पाडले जातात. 
* महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास महिला कार्यकर्त्यांचे गट पाडले जातात. 
* दररोजच्या प्रचाराचे नियोजन, चौकसभांचे नियोजन, रॅलीचे कामकाज प्रचार कार्यालयातून चालते. 
* दररोज होणाऱ्या खर्चाची नोंदही ठेवली जाते. 

प्रचार कार्यालयासकट सर्व खर्च निवडणूक आयोगाला दिला जातो; मात्र कार्यालये शहरात नेमकी कुठे थाटायची याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ एकत्रितपणे घेतात. 
- नरेश म्हस्के, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना.

मुंबई

मुंबई - अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना महिलांकडे पाहून अश्‍लील कृत्य करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तब्बल...

09.45 AM

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये राबवण्यास...

09.30 AM

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता मिळविली. भाजपने जोरदार...

05.33 AM