पद्मनाभस्वामी मंदिराजवळ आगीत 2 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

कचरा पेटविण्यात आल्‍यामुळे ही आग लागली असल्‍याचे सांगण्यात आले.

तिरुअनंतपुरम : येथील प्रसिद्ध पद्‍मनाभस्वामी मंदिराच्या ठिकाणी आज (रविवार) सकाळी मोठी आग लागली. यामध्ये दोनजण जखमी झाले. 
 
पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर ही आग विझविण्यासाठी एकूण 16 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मंदिराच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारापासून 25 मीटर अंतरावर टपाल खात्याच्‍या एका गोदामाला ही आग लागली. आग लागल्‍यानंतर या भागातील लोकांमध्ये खळबळ उडाली. मंदीर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने गोदाम परिसरात गर्दी होती. कचरा पेटविण्यात आल्‍यामुळे ही आग लागली असल्‍याचे सांगण्यात आले. या आगीत गोदाम जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्‍यात यश आल्‍याने मोठी दुर्घटना टळली.