कसाऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

खर्डी - शहापूर तालुक्‍यातील कसारा राड्याचा पाडा येथील जंगलात एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदर सोमा वाघ व सखुबाई श्रावण झुगरे (रा. माळगावठा) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही विवाहित होते; मात्र त्यांच्यात अनेक महिन्यांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.

त्यांना कुटुंबीयांना सोडून विवाह करता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. सखुबाई ही दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती. त्याबाबत तिच्या पतीने पोलिसांकडे तक्रार केली होती. राड्याचा पाडा गावाजवळ आज दोघांचेही मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळले.