किशोरी आमोणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सांगितिक आदरांजली

Kishori-Amonkar
Kishori-Amonkar

कल्याण - गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रमलखुण आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्यावतीने त्यांना सांगितिक आदरांजली वाहण्यात येणार आहे. सात एप्रिल रोजी सुभेदार वाडा शाळेत संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किशोरीताईंचे ज्येष्ठ शिष्य तसेच प्रसिध्द  गायक पंडित रघुनंदन पणशीकर ही आदरांजली वाहतील.

भारतीय संगीत क्षेत्रातील महान तपस्वी म्हणून परिचित असलेल्या जयपूर घराण्यातील या गायिकेने 1950 च्या दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस सुरुवात केली.  गीत गाया पत्थरोंने या हिंदी चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले. 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या दृष्टी या हिंदी चित्रपटाच्या संगीतकार म्हणूनही किशोरीताईंनी आपले कौशल्य दाखवले. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताबरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकार त्या प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते. स्वरार्थरमणी - रागरस सिद्धान्त हा संगीत शास्त्रावरील ग्रंथाचे लिखाण त्यांनी केले. संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार किशोरी आमोणकर यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.

किशोरीताईंचा जन्म 10 एप्रिल 1931 रोजी झाला. तीन एप्रिल 2017 ला त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना संगीतमय आदरंजली वाहण्यिचा हा  रमलखूण आणि सुभेदारवाडा कट्ट्याचा प्रयत्न आहे. स्वरांजली या  कार्यक्रमात  पं रघुनंदन पणशीकर  विविध भाषांतील गाणी सादर करतील. हिंदी, कन्नड भाषेतील भजने, मराठी भावगीते आणि अभंगही ते  सादर करतील.  कार्यक्रम सुभेदारवाडा कट्टा, गांधी चौकी, कल्याण (प.) येथे होईल. हा कार्यक्रम विनामुल्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com