लस्सी, आइस्क्रीमचे 15 नमुने प्रयोगशाळेकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई शहर आणि उपनगरातून आइस्क्रीम, आंब्याचा रस, लस्सी आदी पदार्थांचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल 15 दिवसांत येईल.

मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई शहर आणि उपनगरातून आइस्क्रीम, आंब्याचा रस, लस्सी आदी पदार्थांचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल 15 दिवसांत येईल.

लस्सी, आइस्क्रीम, आंब्याचा रस या पदार्थांमध्येही अनेक रसायनांचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे ते योग्य वातावरणात ठेवण्यात येत नाहीत. यामुळे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. या पदार्थांबाबत एफडीएकडे तक्रारी आल्यानंतर 15 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, एफडीएने मंगळवारी (ता. 23) जुहू येथील जुहू टी अँड कोल्ड्रिंक हाऊसमधील बर्फाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर विक्रेत्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे एफडीएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.