लातूर एक्‍स्प्रेस आता बिदरपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई  - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या "लातूर एक्‍स्प्रेस'चा मार्ग वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. "लातूर एक्‍स्प्रेस' आता बिदरपर्यंत चालवण्यात येणार आहे. त्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "हिरवा कंदील' दाखवण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील "रेल भवन'मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.