वकिलांच्या संपामुळे न्यायालयांचे काम थंडावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - प्रस्तावित वकील कायद्यातील सुधारणेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील वकिलांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी (ता. 31) न्यायालयांचे कामकाज थंडावले.

मुंबई - प्रस्तावित वकील कायद्यातील सुधारणेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील वकिलांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी (ता. 31) न्यायालयांचे कामकाज थंडावले.

बार कौन्सिल ऑफ इंडियाने संपाची हाक दिली होती. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक न्यायालयांमध्ये वकील गैरहजर होते. संप यशस्वी झाला, असा दावा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य आशिष देशमुख यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती हजर होते. मात्र, वकील मोठ्या संख्येने गैरहजर होते. त्यामुळे अनेक खटले तारीख देऊन तहकूब करण्यात आले. आवी ही वकिलांची संघटनाही संपात सहभागी झाली होती. वकिलांच्या कायद्यात सुचवलेल्या तरतुदींना वकिलांच्या संघटनेने आक्षेप घेतला. या तरतुदींमुळे देशातील विधी अभ्यासक्रम आणि व्यवसायाच्या पारदर्शकता आणि स्वायत्ततेला हानी पोचण्याची शक्‍यता आहे, असे संघटनेचे मत आहे.