उल्हासनगरातील मध्यवर्ती सरकारी रुग्णालयाला गळती

Leakage to central government hospital in Ulhasnagar
Leakage to central government hospital in Ulhasnagar

उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाला संततधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लहान मुलांचा वॉर्ड खाली करून मुलांना दुसऱ्या वार्डात स्थलांतरित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने डागडुजी किंबहूना नूतनीकरणा अभावी  रुग्णालयाची खस्ता हालत झाल्याची खंत जिल्हा शल्यचिकित्सकांनी व्यक्त केली असून तातडीने निधीची व्यवस्था करून नूतनीकरणाचे काम हाती घेतले नाही तर शिवसेना आंदोलन करणार.असा इशारा शिवसेना अपंग सहाय्य सेनेने दिला आहे.

गेल्या पाच दिवसापासून शहरात लागोपाठ कधी मुसळधार तर कधी अधून मधून पाऊस सुरू असून त्याचा फटका मध्यवर्ती सरकारी रुग्णालयाला बसला आहे. अनेक ठिकाणी गळती लागल्याने रुग्णांची दैना झाली असून डॉक्टरांची तारांबळ उडालेली आहे. काल रात्री 8 च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील लहान मुलांच्या 11 नंबर वॉर्डच्या स्लॅबला गळती लागली. वॉर्डाला तळ्याचे स्वरूप मिळाले. ही बाब परिचारिका यांनी वरिष्ठांना कळवल्यावर रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जाफर तडवी, मेट्रन बाबू बर्डे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि लहान मुलांचे थेलेसिमिया वॉर्डात स्थलांतर केले.

आज शिवसेना कल्याण लोकसभा अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष भरत खरे यांनी डॉक्टरांसोबत रुग्णालयाची पाहणी केली. मध्यवर्ती सरकारी रुग्णालय ज्या जुन्या इमारत आहे त्याला बांधून भरपूर वर्ष झाली आहेत. त्याची डागडुजी तर सोडा साधी रंगरंगोटी केली जात नाही. रुग्णालयाला जिल्ह्याचा दर्जा दिला गेला असताना रुग्णालया समोरच्या रस्ताची अत्यंत बिकट अवस्था आहे. आता रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात गळती सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनमोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे काय? निधीची व्यवस्था करून रुग्णालयाचे नूतनीकरण डागडुजी का केली जात नाही? असा सवाल करून निधीची व्यवस्था करून तातडीने नूतनीकरणाचे काम हाती घेतले नाही तर शिवसेना आंदोलन करणार असा इशारा दिला.

याबाबत जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, रुग्णालय खस्ता खात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बाजूलाच असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुग्णालयाचे नूतनीकरण डागडुजीची जबाबदारी आहे. त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला गेलेला आहे. पण निधी नसल्याचे कारण देऊन ते हात झटकत आहेत. ही बाब शासनाच्या आरोग्य विभागाला कळवली असल्याची माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. किमान रुग्णालयाच्या छतावर पत्रांचे आवरण टाकले तर गळती होणार नाही असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत ढिलपे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मॅसेज देखील केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com