आरेमध्ये मुलावर बिबट्याचा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - आरे वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या बालक जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितेश माळवी असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर आदिवासींनी पुन्हा वस्तीवर वीजपुरवठा करण्याची व रस्ते तयार करण्याची मागणी केली आहे. मरोळ येथे राहणारे माळवी कुटुंब जवळच्या पाड्यावर नातेवाइकाच्या लग्नाला गेले होते.

एका नातेवाइकाने लग्नमंडपाच्या बाहेर बिबट्याला पाहिले. त्याने आरडाओरडा करताच बिबट्याने या बालकाला उचलले आणि काही अंतरावर सोडून दिले. गेल्या आठवड्यात मुलीच्या शरीराचे तुकडे सापडल्यानंतर बिबट्याने हा हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त होत होता. शवविच्छेदन अहवालात तो बिबट्याचा हल्ला नसल्याचे उघड झाले, अशी माहिती ठाणे प्रादेशिक वन विभागाच्या मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल संतोष कंक यांनी दिली.