भारत-चीन मैत्रीच्या दस्तऐवजाचे जतन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक व माजी अध्यक्ष माओ झेडॉंग उत्तम सुलेखनकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या चीनबाहेर असलेल्या तीन सुलेखन शैलीतील पत्रांपैकी एक पत्र म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पाठवलेला शोकसंदेश. या वर्षी कोटणीस यांच्या निधनास 75 वर्षे होत असून, त्यानिमित्ताने माओ यांच्या शोकसंदेशाचे नव्याने जतन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात झालेल्या या कार्यक्रमाला चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई उपस्थित होते. 

कलिना येथील विद्यानगरीत नव्याने बांधण्यात आलेल्या "झी शियानलिन सेंटर फॉर इंडिया चायना स्टडीज' या वास्तूत हा कार्यक्रम झाला. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, डॉ. कोटणीस यांचे कुटुंबीय, तसेच ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे मुंबईतील अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते. 
 
टॅग्स