नीरव मोदीच्या नगरमधील जमिनीबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ

Local administration ignored the land of Nirav Modi in Nagar
Local administration ignored the land of Nirav Modi in Nagar

मुंबई - हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर अंबलबजावणी संचलनालयाकडून टाच आणली जात असली तरी अहनदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील डोंगरावर अडीचशे एकर जमिनीबाबत स्थानिक प्रशासन मौन बाळगून आहे. कारवाईबाबत पोलिस आणि महसुल प्रशासन अनभिज्ञ आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेमध्ये 11 हजार 300 कोटींचा घोटाळा आहे. याशिवाय त्यांनी देशातील व परदेशांतील इतरही काही बँकांना फसविले. नंतर हा हिरे व्यापारी विदेशामध्ये पळून गेला आहे. सरकारने ईडीमार्फत त्यांच्या देशातील सर्व मालमत्तावर टाच आणण्यास सुरवात केली आहे. त्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

कारवाईमधे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील डोंगरावर नीरव मोदी याने सन 2011 मध्ये स्वतःच्या व फायर स्टोन डायमंड प्रा. लि., मुंबई या कंपनीच्या नावावर गट नंबर-31, 35, 39/1, 58, 59, 61, 62, 63, 96/3, 70/1, 70/2/1, 70/2/2/1/2, 78/1 व 82 मधील सुमारे 235 एकर जमीनचा समावेश आहे.

यासंदर्भात अ. नगर पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कारवाईचा कोणताही पत्रव्यवहार पोलिसांकडे झाला असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे जप्तीच्या कारवाईची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही महसुल विभागाला या जमीनीबाबत कल्पना नव्हती.

नीरव मोदी यांच्या येथे असलेल्या जमिनी या स्थानिक शेतकऱ्यांच्या आहेत. त्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी 'काळीआई मुक्तीसंग्राम' आंदोलन केल्यानंतर हा विषय चर्चेला आला आहे. या मागणी मागे स्थानिक राजकारण असून सर्व जमिनीचे व्यवहार सहमतीने झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कर्जत येथे निरव मोदी यांनी खंडाळा येथे सुरू केलेल्या सोलर प्रकल्प हा माळढोकसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे उभा केला असून या जमिनीचा वापर बिगरशेती न करताच व्यवसायासाठी सुरू करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही जमीन त्याने स्वत:च्या आणि त्याची फायर स्टोन कंपनी यांच्या नावे खरेदी केल्याचे उघड झाले आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर निरव मोदी व कर्जत कनेक्शनबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकजण खंडाळा येथे जाऊन मोदीच्या जागेची पहाणी करीत आहेत.

खंडाळा येथील डोंगरावर खरेदी केलेल्या जागेवर निरव मोदी यांनी 2011 मध्ये फायर स्टोन, डायमंड प्रा. लि. या कंपनीच्या नावावर सोलर प्रोजेक्ट सुरू केला आहे. यामध्ये जमीन खरेदी करण्यापासून प्रकल्प उभा करणे, औद्योगिक परवाना नसणे येथपासून तर तयार केलेली वीज सरकारला विकणे या सर्वच बाबींमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत हा प्रकल्प चालवण्यात आला आहे. यामध्ये माळढोक आरक्षण येथील सर्व गटामध्ये असतानाही या जागेवर त्यांनी हा प्रकल्प उभा कसा केला? केवळ उभा केला नाही तर तो 7 वर्षापासून आजही राजरोसपणे सुरू कसा? हा प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा हा प्रकल्प आहे असे वारंवार सांगितले जात होते. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी येथे कारवाई केली नाही व शहानिशा केली नाही असे सांगण्यात येत आहे.

खंडाळा (जि. नगर) येथील ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असतानाच माळढोक पक्षी आरक्षण उठविण्यासाठी लढा देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी सर्वात प्रथम हा प्रकल्प बेकायदेशीर उभा रहात आहे याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र कंपनी व महसूलचे अधिकारी यांनी फक्त कागदी घोडे नाचवले. त्याचवेळी कारवाई झाली असती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. एकंदरीतच या प्रकल्प आणि जमिनीबद्दल पोलिस आणि महसुल प्रशासन दबावाखाली असून माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

नीरव मोदी याने येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष दाखवून फसवून कमी दरामध्ये खरेदी केल्या आहेत.
- कैलास शेवाळे, स्थानिक नागरिक 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com