निष्ठावंतांना डावलले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांमुळे दलित निष्ठावंत महिलांना उमेदवारीत डावल्याचा आरोप काही महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पक्षाने नवख्या महिलांनाच उमेदवारीचे वाटप केल्याचा आरोप करत महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष वनिता गोतपगार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या उमेदवारांना मदत करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.७) गडकरी रंगायतनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

ठाण्यातील सर्वच राजकीय पक्ष बंडखोरीने हैराण झाले आहेत. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनीही बंड घोषित करून शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे सांगितले आहे. विशेषतः प्रभाग ४, १४ आणि २२ येथील कार्यकर्ते शिवसेनेला मदत करणार आहेत. या महिलांनी केलेल्या आरोपानुसार प्रभाग ४ आणि १४ च्या पॅनेलची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर होती; पण त्यांनी १५ वर्षांपासून काम करत असतानाही दलित महिलांना उमेदवारी देण्यात पक्षाने टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे कळवा, मुंब्रा या ठिकाणी उभ्या केलेल्या उमेदवारांसाठी व्यस्त असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांचे राजकारण यशस्वी केल्याचे या महिलांनी सांगितले. 

आम्ही पक्षासाठी गुन्हे  अंगावर घेतले आहेत. पक्षाला फक्त आमच्यासारख्या मागासवर्गीय महिला ढाल म्हणून पाहिजे असतात, असा आरोपसुद्धा या महिलांनी केला. यावेळी आघाडीच्या माजी अध्यक्षा वनिता गोतपगार, मीरा कासार, गीतांजली तांबे, सीमा कदम, शांती नाडर उपस्थित होत्या.