झाडे वाढली की सुशिक्षितांना त्रास होतो- पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

राज्यातील 17 शहरांतील प्रदूषण नियंत्रित करण्याबाबत आमच्या योजना आहेत.

मुंबई : प्रदूषण नियंत्रण आणण्याचे आव्हान खूप मोठे आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहे. परंतु त्यासाठी सामन्यांकडून सहकार्य मिळायला हवे. झाडांची संख्या वाढली की दुर्दैवाने सुशिक्षित माणसांना त्रास होतो अशी खंत राज्यपर्यावरण मंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी व्यक्त केली.

पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित 'शुद्ध हवा संकल्प - महाराष्ट्र 2022' या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. राज्यातील 17 शहरांसह गुजरात राज्यातील सुरत शहराकरता हवा गुणवत्ता सनियंत्रण उत्सर्जन स्त्रोत संविभाजन व सुधारणा या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. 

देशभरात 94 शहरे जास्त प्रदूषित आहेत. त्यापैकी सर्वात जास्त शहरे महाराष्ट्रात दिसून येतात. राज्यातील 17 शहरांतील प्रदूषण नियंत्रित करण्याबाबत आमच्या योजना आहेत. कारखान्यातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी एसजीपी यंत्रणा बसवण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्याचसोबत झाडांची संख्याही वाढायला हवी. परंतु झाडे वाढली की मच्छरांना आमंत्रण मिळते म्हणून सुशिक्षित माणसांना मोठी झाडे नकोच अशी तक्रार करतात ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे राज्य पर्यावरण मंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

Web Title: maharashtra marathi news pollution tree plantation literates