मेडिकल कौन्सिल निवडणुकीत बनावट, कमी मतदानाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी आणि बनावट मतदान होण्याची शक्‍यता आहे, अशी भीती इंडियन मेडिकल कौन्सिलने (आयएमए) व्यक्त केली आहे.

मुंबई - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी आणि बनावट मतदान होण्याची शक्‍यता आहे, अशी भीती इंडियन मेडिकल कौन्सिलने (आयएमए) व्यक्त केली आहे.

प्रेस क्‍लबमधील पत्रकार परिषदेत संघटनेने पत्रकार परिषद घेतली. निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसाठी मतदान करणाऱ्या राज्यभरातील सदस्यांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहचलेली नाही. मोजक्‍या वृत्तपत्रांत आणि कौन्सिलच्या वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध केल्यामुळे अनेकांपर्यंत ही माहिती पोहचलेली नाही, असे आयएमएचे माजी पदाधिकारी डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले. रविवार असल्याने अनेक ठिकाणी बाजार असतो. याच दिवशी सुट्या असल्याने लोक डॉक्‍टरकडे येतात. ग्रामीण भागांत अनेक तास खर्च करून काही अंतरावरील मतदान केंद्रावर मतदानासाठी डॉक्‍टर येणे कठीण आहे, अशी शंका डॉ. पिंगळे यांनी व्यक्त केली.

निवडणुकीत प्रगती आणि शिव आरोग्य सेना अशी दोन राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेली पॅनेल आहेत. काही पक्षांनी निवडणुकीत लावलेला जोर पाहता या वेळी बनावट मतदानाची शक्‍यता असल्याचे डॉ. पिंगळे म्हणाले. यासाठी रिटर्निंग ऑफिसरना लेखी कळवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रुग्णांना न्याय मिळवून देण्याचे काम करते. कौन्सिल कायमस्वरूपी असेल, तरच त्याचा फायदा रुग्णांना होईल. कौन्सिलवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकाने आपत्कालीन स्थितीत काम करणे अपेक्षित आहे, असे सांगत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल स्थिर राहण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता असल्याचे मत डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी मांडले.

राज्यातील एमएमसी सदस्य - 85 हजार
एकूण मतदान केंद्रे - 110
मुंबईतील मतदार - 21 हजार
ठाण्यातील मतदार - 10 हजार
पुण्यातील मतदार - 7 हजार
रायगडमधील मतदार - 1 हजार 700

मुंबई

कल्याणः प्लास्टिकची अंडी, चीनी अंडी, अंडयात प्लास्टिक निघाले अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. तीन ठिकणांहून...

04.45 PM

कल्याणः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रेल्वे प्रशासन नुसार प्रत्येक रेल्वे स्थानक परिसरात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट...

04.09 PM

मुंबादेवी : 'सकाळ'च्या प्लॅस्टिकमुक्त वसुंधरा अभियानास उमरखाडी येथे सर्व गोविंदा पथकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.येथील गणेश...

12.00 PM