तटकरे यांच्या कार्यक्रमाला जाण्यात गैर काय? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - ""राज्यातच नव्हे, तर देशभरातच अशी संस्कृती आहे की, राजकारणात आरोप - प्रत्यारोप झाले तरी चांगल्या गोष्टीत सहभागी व्हायचे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर सिंचन गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. ती खंडित होणार नाही, मात्र त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाण्यात गैर काय आहे, असा सवाल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी प्रदेश भाजपमध्ये भाजपने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी "राष्ट्रवादी'चे नेते सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत उल्लेख आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याच्या पलीकडे मैत्री असायला हवी. त्यांच्यावर सिंचन गैरव्यवहाराचे आरोप असले तरी ते सिद्ध झालेले नाहीत. या वेळी उपस्थित असलेले मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले की, या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण आहे.